AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी 2 आठवडे दिले, नंतर 2 दिवसांतच हल्ले, ट्रम्प यांनी इराणसोबत असं का केलं? नेमकं काय घडलं?

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले आहेत. अगोद अमेरिकेने इराणला दोन आठवडे दिले होते. पण नंतर हा वेळ न देताच अमेरिकेने हल्ला केला.

आधी 2 आठवडे दिले, नंतर 2 दिवसांतच हल्ले, ट्रम्प यांनी इराणसोबत असं का केलं? नेमकं काय घडलं?
donald trump and ayatollah khamenei
| Updated on: Jun 22, 2025 | 9:03 PM
Share
Iran Israel War Update : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर एअर स्ट्राईक केलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगावरच युद्धाचे काळे ढक जमा झाल्याचं बोललं जातंय. आता इराण या हल्ल्यांना जशास तसं उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेने अगोदर इराणला चर्चेसाठी सहमती दाखवण्यास 2 आठवड्यांचा वेळ दिला होता. मात्र लगेच दोन दिवसांत एअर स्ट्राईक केलं. त्यानंतर आता अमेरिकेने असा निर्णय का घेतला? अस सवा केला जात आहे.

दोन आठवड्यांचा वेळही दिला होता, पण…

अमेरिकेने अगोदर इराणला इस्रायलससोबत चर्चा करायला तयारी दाखवा, असे सांगितले होते. त्यासाठी अमेरिकेने इराणला दोन आठवड्यांचा वेळही दिला होता. दुररीकडे इराण हा थेट अमेरिकेऐवजी युरोपियन संघाशी चर्चा करत होता. मात्र दोन आठवडे देण्याऐवजी लगेच दोन दिवसांच्या आत अमेरिकेने इराणवर हल्ला केला. एक्सियोसने दिलेल्या वृत्तानुसार थेट सैन्य कारवाई करण्याआधी इराण आणि अमेरिका यांच्या अधिकाऱ्यांत चर्चा व्हावी या पर्यायावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करत होते. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी जी-7 बैठकीदरम्यान तसा प्रस्ताव ट्रम्प यांच्यापुढे ठेवला होता.

अमेरिकेने चर्चेसाठी दाखवली होती तयारी पण…

हा प्रस्ताव मान्य करत ट्रम्प यांनी इराणशी चर्चा करण्यास सहमती दर्शवली. त्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हेन्स तसेच व्हाईट हाऊसचे दूत व्हिटकॉफ यांना पाठवण्याची तयारी केली होती. ट्रम्प स्वत:देखील या चर्चेत सहभागी होण्यास तयार झाले होते. या चर्चेसाठी तयारी दर्शवण्यासाठी अमेरिकेने इराणला दोन आठवड्यांचा वेळ दिला होता.

…पण ते शक्य झाले नाही

अमेरिकेचा हा प्रस्ताव एर्दोगान यांनी ईराणचे राष्ट्रपती पेजशिकयान तसेच परराष्ट्रमंत्री अब्बास यांच्यापुढे ठेवला होता. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याशी यावर चर्चा करण्याचा प्रयत्न झाला. पण ते शक्य झाले नाही. नंतर हीच माहिती तुर्कीने अमेरिकेला सांगितली.

…अन् अमेरिकेने हल्ला केला

ही बैठक रद्द झाल्यानंतर एर्दोगान यांनी इस्तानबूल येथे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. अमेरिकेशी चर्चा करावी, असा आग्रह धरला होता. मात्र तसे घडू शकले नाही. त्यानंतर बैठक रद्द झाल्याचे समजताच ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची तयारी चालू केली आणि नियोजनाप्रमाणे इराणच्या आण्विक केंद्रांवर अमेरिकेने हल्ले केले. आता या युद्धात पुढे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा