AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या अटॅकनंतर आता कच्च्या तेलाचा भडका, ट्रम्प यांच्यामुळे अख्खं जग होरपळणार?

इराण इस्रायल यांच्या युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. त्यामुळे कच्च्य तेलाची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या अटॅकनंतर आता कच्च्या तेलाचा भडका, ट्रम्प यांच्यामुळे अख्खं जग होरपळणार?
iran and israel war and brent crude oil
| Updated on: Jun 22, 2025 | 3:59 PM
Share

अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. फोर्डो, नतांज, इस्फहान या भागात असलेल्या आण्विक केंद्रांवर हे हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान, इराण आणि इराक यांच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे मध्य-पूर्वेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे इंधन, नैसर्गिक वायू यांचा भाव गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कच्च्या तेलाची किंमत तब्बल….

इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यात ब्रेंड क्रूड ऑईलची किंमत तब्बल 18 टक्क्यांनी वाढली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत आता 75 डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास पोहोचली आहे. अमेरिकेनेही इराण-इस्रायल यांच्यातील युद्धात उडी घेतल्यामुळे आता कच्च्या तेलाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते हा संघर्ष आणखी वाढला तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 120 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

निर्यातीसाठी खर्च, वेळ वाढणार

इस्रायल आणि इराण यांच्यतील युद्धामुळे होरमूज जलडमरुमध्य या भागाला हाय रिस्क झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याच भागातून जास्तीत जास्त कच्या तेलाची निर्यात केली जाते. होरमूज हा भाग हाय रिस्क झोन घोषित केल्यानंतर विमा कंपन्यांनी आपले प्रिमियम वाढवले आहेत. अनेक शिपिंग कंपन्यांनी होरमूज या भागातून जाण्याऐवजी अन्य वैकल्पिक रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडला आहे. यामुळेच आता कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी लागणारा वेळ आणि खर्च हे दोन्ही वाढले आहेत.

120 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतो भाव

उर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते होरमूज जलडमरुमध्य या भागातील कच्च्या तेल्याचा निर्यातीत काही बाधा निर्माण झाली तर यामुळे कच्च्या तेलाची किंमत वाढ शकते. क्रूड ऑईलचा भाव थेट 120 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतो. जेपी मॉर्गन, सिटी बँक आणि डॉयचे बँक यासारख्या अनेक वित्तीय संस्थांनी तर इराण-इस्रायल संघर्ष असाच कायम राहिला तर कच्च्या तेलाची किंमत तब्बल 130 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकते, असे भाकित व्यक्त केले आहे.

दरम्यान, आता इराण-इस्रायल यांच्यातील युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यानं शेअर बाजारदेखील गडगडला आहे. अमेरिकी शेअर बाजारात घसण पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसा काढून आता सोने आणि अन्य क्षेत्रांत गुंतवणूक करत आहेत.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.