इराणचा अमेरिकन एअरबेसवर मोठा हल्ला, हेरगिरी करणाऱ्या महागड्या विमानाला केले नष्ट, किती आहे किंमत ?

अमेरिकेचे हे विमान विशाल हवाई क्षेत्राची निगराणी करणे, विविध प्रकारचे लढाऊ विमानांच्या दरम्यान ताळमेळ साधण्यास सक्षम आहे. अमेरिके शिवाय हे विमान फ्रान्स, ब्रिटन आणि सौदी अरब सारख्या देशांच्या सैन्य दल या विमानाचा वापर करत असते.

इराणचा अमेरिकन एअरबेसवर मोठा हल्ला, हेरगिरी करणाऱ्या महागड्या विमानाला केले नष्ट, किती आहे किंमत ?
E-3 SENTRY
| Updated on: Mar 29, 2026 | 7:24 PM

इराणने सौदी अरबच्या प्रिन्स सुलतान एअर बेसवरील क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला करुन अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. २७ मार्च रोजी झालेल्या या हल्ल्यात अमेरिकन वायूसेनेच्या महत्वाच्या E-3 Sentry AWACS (Airborne Warning and Control System) विमान नष्ट केले आहे. तसेच हवेत इंधन भरणाऱ्या अनेक टँकर विमानांना या हल्ल्याची झळ बसली आहे. या हल्ल्यात १० हून अमेरिकन सैनिक देखील जखमी झाल्याचा दावा इराणने केला आहे. सोशल मीडियात आलेल्या फोटोत Sentry AWACS विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडने या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टींगने ( IRIB) देखील त्यांच्या एक्स हँडलवरुन नष्ट करण्यात आलेल्या अमेरिकन विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत. फ्लाईट ट्रॅकींगच्या डेटानुसार हल्ल्याच्या आधी या विमानतळावर सुमारे E-3 Sentry विमान तैनात होते. हे एक सर्व्हीलान्स विमान असून त्याचा उपयोग आकाशात शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांचा अंदाज घेण्यासाठी करण्यात येत असतो. इराणच्या हल्ल्यात नष्ट झालेल्या या महत्वाच्या विमानामुळे अमेरिकेच्या एरियल ऑपरेशनच्या क्षमतेवरुन नवीन चिंता व्यक्त केली जात आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीनुसार या एका विमानाची किंमत 700 दशलक्ष डॉलर ( 6600 कोटी ) इतकी आहे.

का महत्वाचे आहे E-3 Sentry विमान –

E-3 Sentry विमानाला अमेरिकेच्या एरियल ऑपरेशनचा बॅकबोन मानले जाते. हे विमान हवेत उडणारे एक कंट्रोल एण्ड कमांड सेंटर सारखे आहे. हे विमान अमेरिकन वायू सेनेला इंटेलिजन्स, सर्विलान्स आणि रिकॉनिसेंस ( गुप्त माहिती जमवणे ) सारख्या महत्वपूर्ण क्षमता प्रदान करते. १९७० च्या दशकापासून सेवेत असलेल्या या विमानाने अनेक सैनिक मोहिमात उदा. ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म, कोसोवो युद्ध, इराक आणि अफगाणिस्तान मोहिमा, ऑपरेशन इनहेरेंट रिझॉल्वमध्ये निर्णायक भूमिका निभावत आहे.

जेट फायटर पायलटला मदत करते

अमेरिकन वायूदलाचे माजी एफ-१६ पायलट आणि डिफेन्स पॉलीसी एक्सपर्ट हीथर पेनी यांनी या घटनेला खूपच गंभीर आणि चिंताजनक म्हटले आहे. अमेरिकेचे फॉरेन एण्ड डिफेन्स पॉलीसी एक्सपर्ट केली ग्रीको यांनी यास शॉर्ट टर्ममध्ये मोठे नुकसान म्हटले आहे. तसेच त्यांनी इशारा दिला आहे की या घटनेमुळे अमेरिकेच्या यु्द्ध ऑपरेशन कव्हरेजमुळे यामुळे गॅप येऊ शकतो असे म्हटले आहे. AWACS ची भूमिका बुद्धीबळाचा मास्टर सारखे संपूर्ण युद्धक्षेत्राचे चित्र दाखवण्या सारखी असते आणि याच माहिती आधारे फायटर पायलट कोणतीही मोहिम तडीस नेत असतात.

येथे पोस्ट पाहा –

विचारपूर्वक केलेली कृती

सौदी अरबमधील हा बेस अमेरिकन ऑपरेशन्सचा प्रमुख केंद्र असून इराण युद्धात अमेरिका या तळावर अवलंबून आहे. त्यामुळे यास हाय व्हॅल्यु टार्गेट मानले जात आहे. इराणचा प्रिन्स सुलतान एअरबेसवरील हा हल्ला एक विचारपूर्वक केलेली कृती आहे. त्याचा हेतू अमेरिकेची एअर पॉवरसाठी महत्वाच्या असलेल्या रडार सिस्टीम, कम्युनिकेशन आणि AWACS सारख्या गुप्तहेर विमानाला टार्गेटला नष्ट करणे हा आहे.

 

Follow Us