AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशात जगातील सर्वात मोठी नोट, त्यातून भारतात काय विकत घेता येते ?

जगात इराण आणि व्हेनेझुएलासारखे आर्थिक संकटात सापडलेले देश जगात सर्वात मोठ्या चलनाच्या नोटा जारी करतात. इराण येथे एक कोटी रियालची नोट अस्तित्वात आहे. ही जगातील सर्वाधिक मुल्याची नोट आहे.

या देशात जगातील सर्वात मोठी नोट, त्यातून भारतात काय विकत घेता येते ?
IRAN RIALS
| Updated on: Mar 27, 2026 | 7:40 PM
Share

Largest banknote in the world:जगात अनेक देशात वेगवेगळ्या मुल्यांच्या नोटा प्रचलित आहेत. परंतू तुम्हाला माहिती आहे का एक असाही देश आहे. जेथे एक कोटीची नोट देखील चलनात आहे. भारतात सर्वाधिक मुल्याची २००० रुपयांची नोट चलनाच्या बाहेर काढण्यात आली आहे. आणि आता ५०० नोट सर्वात जास्त मुल्यांची आहे. अशा एका देशात १ कोटीची नोट जारी केलेली आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल, परंतू या मागे त्या देशाची खराब आर्थिक स्थिती आणि महागाई कारणीभूत आहे. चला तर आज पाहूयात. जगातील कोणत्या देशात सर्वात मोठी नोट चलनात आहे. त्या नोटे भारतात काय विकत घेता येते हे देखील पाहूयात..

या देशात आहे सर्वात मोठ्या चलनाच्या नोट

इराण आणि व्हेनेझुएला या देशांत जगातील सर्वात मोठ्या चलनाच्या नोटा आहेत. इराणमध्ये एक कोटीचा रियालची नोट चलनात आहे. ही जगातील सर्वात मोठ्या मुल्याची नोट आहे. व्हेनेझुएला सरकारने देखील महागाईचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या मुल्याच्या नोटा जारी केल्या आहेत. साल २०२१ मध्ये व्हेनेझुएलात २ लाख, ५ लाख आणि १० लाख बोलिवरच्या नोटा जारी केल्या आहेत.हे पाऊल यासाठी उचलले आहे की लोकांना दैनंदिन जीवनात खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घ्यायची गरज लागू नये. ही रक्कम जरी ऐकायला मोठी वाटत असली तरी त्याची किंमत खूप कमी आहे. एक कोटी इराणी रियालची किंमत केवळ ७ डॉलर किंवा ६५० भारतीय रुपयांच्या बरोबर आहेत. एवढ्या मोठ्या किंमतीच्या नोटेला भारतात चालवले तर यातून भारतात खूप कमी सामान खरेदी केले जाऊ शकते.

महागाईने बिघडली, इराण आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था

इराणच्या सर्वात मोठ्या एक कोटी रुपयाची नोट काढण्यामागे महागाई आणि कॅशची कमी आहे. इराणच्या सेंट्रल बँकेचे म्हणणे आहे की कॅशच्या कमतरतेमुळे कमी होऊ नये म्हणून ही एक कोटीची नोट बाजारात आणली आहे. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था देखील अनेक वर्षापासून संकटात आहे. येथील करन्सी सातत्याने कमजोर होत गेली आहे. आणि महागाई एवढी वाढली पैशांची किंमत वेगाने घसरली. परिस्थिती इतकी बिकट झाली ती सामान खरेदी करण्यासाठी गोणीभरुन नोटा घेऊन जावे लागत होते. परंतू त्या बदल्यात मोजक्यात वस्तू खरेदी करता येत होत्या. तेल संपन्न देश असून आर्थिक विस्कळीतपणा, निर्बंध आणि इतर कारणाने व्हेनेझुएलाची स्थिती सातत्याने ढासळू लागली. त्याचमुळे येथील सरकारला वारंवार मोठ्या नोटा जारी कराव्या लागल्या.

भारतात या मोठ्या नोटांनी काय खरेदी करता येते ?

इराणची सर्वात मोठी नोट एक कोटी रियालची नोट आहे. मात्र, या नोटेची किंमत भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमी मानली जाते. जर आताच्या हिशेबाने इराणच्या एक कोटी रियाल करन्सीला भारतीय रुपायात बदलले तर इराणचे एक कोटी भारतात केवळ ६५० रुपयांच्या बरोबर होतात. या रुपयात खूपच कमी वस्तू भारतात खरेदी करता येतील.

एवढ्या मोठ्या किंमतीच्या नोटांची का होत छपाई ?

आर्थिक तज्ज्ञानुसार जेव्हा कोणत्याही देशात महागाई प्रचंड वाढते तेव्हा तेथील करन्सीची किंमत घसरु लागते. असा छोटी रकमेच्या नोटांना काही किंमत राहात नाही. सरकारला मोठ्या नोटा छापाव्या लागतात. इराण याचे मोठे उदाहरण आहे.यात भारताने देखील १९३८ मध्ये आणि नंतर १९५४ मध्ये १० हजाराची नोट जारी केली होती. मात्र यांना १९४६ आणि १९७८ मध्ये बंद करण्यात आले होते.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'