इराणने लपवून ठेवली ती गोष्ट, अमेरिकेलाही फुटला घाम; आता लवकरच युरोप….

Iran Missile : इराणने हिंदी महासागरातील अमेरिकन-ब्रिटिश लष्करी तळ दिएगो गार्सिया एअर बेसवर दोन मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामुळे अमेरिकेला घाम फुटला आहे.

इराणने लपवून ठेवली ती गोष्ट, अमेरिकेलाही फुटला घाम; आता लवकरच युरोप....
Iran Missile
Image Credit source: Google
| Updated on: Mar 21, 2026 | 6:44 PM

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना पहायला मिळत आहे. आता इराणने हिंदी महासागरातील अमेरिकन-ब्रिटिश लष्करी तळ दिएगो गार्सिया एअर बेसवर दोन मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यांद्वारे इराणने जहाला संदेश दिला आहे की, आता कोणतेही ठिकाण सुरक्षित नाही. इराणच्या या हल्ल्यात एक क्षेपणास्त्र अयशस्वी ठरले आणि दुसरे अडवले गेले आहे, मात्र मुद्दा ‘हिट किंवा मिस’ नसून इराणने आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. सुमारे 4000 किमी अंतरावरील डिएगो गार्सियाला लक्ष्य करून इराणने जगाची झोप उडवली आहे.

इराणच्या ताकदीचा जगाला अंदाज नाही

इराणने आज केलेल्या हल्ल्यातून हे स्पष्ट होते की इराणने कदाचित आपली ताकद जगापासून लपवली आहे. इराणकडे अशी लपलेली क्षेपणास्त्र क्षमता असू शकते, ज्याचा अंदाज जगाला अद्याप नाही. हा हल्ला केवळ आक्रमण नसून एक धोरणात्मक डाव आहे, ज्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्करी नियोजनाला मोठा धक्का बसला आहे. कारण डिएगो गार्सिया हा साधा तळ नाही, तर अमेरिकेच्या जागतिक शक्तीचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या तळावरून हेवी बॉम्बर्स, सर्व्हेलन्स विमानं आणि लांब पल्ल्याच्या मोहिमा चालवल्या जातात. या ठिकाणी हल्ला करून इराणने थेट युरोपियन देशांना आव्हान दिले आहे.

युद्धाचे क्षेत्र वाढले

इराणची निमशासकीय वृत्तसंस्था मेहर न्यूजने या हल्ल्याला मोठे पाऊल असे म्हटले आहे. तसेच इराणच्या क्षेपणास्त्रांची रेंज शत्रूच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे युद्ध आता मध्यपूर्वेतून बाहेर पडून हिंदी महासागरापर्यंत पोहोचले आहे. आता अमेरिका आणि ब्रिटनला त्यांच्या मिसाइल संरक्षण प्रणाली या ठिकाणीही तैनात कराव्या लागणार आहेत.

अमेरिकेची चिंता वाढली

समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेने हा हल्ला थांबवण्यासाठी SM-3 इंटरसेप्शन मिसाईल सिस्टीमचा वापर केला होता. मात्र इंटरसेप्शन यशस्वी झाले किंवा नाही, यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे इराणने आपला हेतू साध्य केला आहे. त्यांनी जगाला दाखवून दिले आहे की ते अमेरिकेच्या संरक्षण प्रणालीला आव्हान देऊ शकतात. यातून जगाला असा संदेश मिळतो की, आता युद्ध मर्यादित प्रदेशात राहणार नाही, तर जिथपर्यंत क्षेपणास्त्र पोहोचेल तिथपर्यंत युद्धाचा विस्तार होईल.

Follow Us