प्रकल्प नष्ट होऊनही इराण आज इतके अणूबॉम्ब बनवू शकतो, IAEA प्रमुखांचा नवीन धक्कादायक खुलासा
इराण वारंवार हीच गोष्ट बोलत आलाय की, त्यांना अणवस्त्र बनवायचं नाही. पण त्यासाठी एजन्सीने पुन्हा त्यांच्या अणूऊर्जा प्रकल्पांच निरीक्षण सुरु केलं पाहिजे असं ग्रोसी म्हणाले.

इराणकडे अजूनही अणूबॉम्ब बनवण्याएवढं पर्याप्त प्रमाणात युरोनियम उपलब्ध आहे. इराणकडे जवळपास 400 किलोग्रॅम 60 टक्के शुद्ध युरेनियम आहे, असं आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सीचे प्रमुख राफेल ग्रोसी म्हणाले. अलीकडेच अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वांस म्हणालेले की, ’10 अणूबॉम्ब बनवण्यासाठी 400 किलोग्रॅम युरेनियम पुरेसं आहे’ कूटनितीक चर्चा अपयशी ठरली, तर इराण विरुद्ध बल प्रयोग होऊ शकतो’ असा इशारा राफेल ग्रोसी यांनी दिला. जिनेवा सॉल्यूशन्स नावाच्या एका संस्थेला दिलेल्या मुलाखतीत ग्रोसी ही गोष्ट बोलले.
इराणने यापेक्षाही जास्त शुद्ध युरेनियमच संवर्धन केलं असतं तर त्यांच्याकडे 10 अणूबॉम्ब बनवण्याइतका पदार्थ असता असं ग्रोसी म्हणाले. पण इराणचा खरोखरच अणवस्त्र बनवण्याचा उद्देश आहे याचे पुरावे नाहीत असं ग्रोसी यांनी सांगितलं. इराण वारंवार हीच गोष्ट बोलत आलाय की, त्यांना अणवस्त्र बनवायचं नाही. पण त्यासाठी एजन्सीने पुन्हा त्यांच्या अणूऊर्जा प्रकल्पांच निरीक्षण सुरु केलं पाहिजे असं ग्रोसी म्हणाले.
इराण पुन्हा सेंट्रीफ्यूज बनवू शकतो
इस्फहान, नतांज आणि फोर्डो या अणवस्त्र तळांच नुकसान झालं आहे. पण ट्रम्प यांनी टोटल डिस्ट्रक्शनचा दावा करुनही इराणच टेक्निकल ज्ञान नष्ट झालेलं नाही असं ग्रोसी यांनी सांगितलं. त्यांच्या मते इराण पुन्हा सेंट्रीफ्यूज बनवू शकतो.
आम्ही सॅटलाइटद्वारे लक्ष ठेऊन आहोत
इराण खरोखरच अणवस्त्र बनवत नाहीय का? या प्रश्नावर ते म्हणाले की, एजन्सीने इस्रायली हल्ल्याच्या आधी त्या ठिकाणांच निरीक्षण केलं होतं. त्यानंतर आम्ही सॅटलाइटद्वारे लक्ष ठेऊन आहोत.
त्यामुळे देशावर हल्ल्याच कारण मिळालं
अमेरिका आणि युरोपियन संघाने इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाची पारदर्शकता तपासण्यासाठी लवकरात लवकर IAEA च्या तात्काळ निरीक्षणाची मागणी केली आहे. पण सध्या IAEA चा कुठलाही निरीक्षक इराणमध्ये नाहीय. प्रतिबंध लागल्यानंतर एजन्सीसोबत झालेला जुना करार इराणला मान्य नाही. इराण सरकारने अलीकडेच राफेल ग्रोसी यांच्यावर टीका केली होती. ग्रोसी यांच्या मागच्या रिपोर्टने इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाबद्दल संशय वाढवला. त्यामुळे देशावर हल्ल्याच कारण मिळालं असं इराणने म्हटलं आहे.
