AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा सर्वोच्च नेता मरणाच्या दारात; कुणी केला धक्कादायक दावा? संपूर्ण जगात खळबळ

इराणच्या सर्वोच्च नेता मरणाच्या दारात केला जात आहे. इराणी मीडियाने केलेल्या दाव्यामुळे संपूर्ण जगात खळबल उडाली आहे.

इराणचा सर्वोच्च नेता मरणाच्या दारात; कुणी केला धक्कादायक दावा? संपूर्ण जगात खळबळ
| Updated on: Aug 08, 2026 | 8:25 AM
Share

इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांचा 28 फेब्रुवारी 2026 साली झालेल्या संघर्षात मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणच्या सर्वोच्च पदावर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांना गादीवर बसवलं होतं. खामेनेई यांना सर्व जगापासून दूर ठेवण्यात आलं आहे. परंतु इस्त्रायलच्या माध्यमांनी धक्कादायक दावा केला आहे. मोजतबा खामेनी यांची तब्येत बिघडली असून तब्येत पूर्णपणे बिघडली आहे. खामेनी हे मरणाच्या दारात असल्याचा दावा इस्त्रायली माध्यमांनी केला आहे.

मोजतबा खामेनी यांचा तब्येत नाजूक, इराणी मीडियाचा दावा 

इस्त्रायली माध्यमांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे. त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्यांचा आता कधीही मृत्यू होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या माध्यमांच्या दाव्यानुसार, रुग्णालयात इराणच्या खामेनी प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या रिपोर्टमध्ये त्यांनी इराणमधील स्वतंत्र्य मीडिया प्लॅटफॉर्म ‘इराणवायर’चा संदर्भ दिला आहे. यात इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्या प्रशासनाशी संदर्भात अनेक बडे दावे करण्यात आले आहेत.

मोजतबा खामेनी जगाच्या नजरेपासून दूर 

इराणवायरच्या रिपोर्टनुसार, पेजेशकियान प्रशासनाच्या दोन बड्या सूत्रांनी खुलासा केला आहे की, 28 फेब्रुवारी रोजी सुप्रीम लीडरच्या परिसरात अमेरिकेने हल्ला केल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी अद्याप मंत्रिमंडळाच्या कोणत्याही सदस्यांची भेट घेतलेली नाही. तर मोजतबा यांचे वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य हल्ल्यात मारले गेले आहेत. इराणचे सुप्रीम लीडर पद सांभाळल्यानंतर मोजतबा खामेनी एकदाही समोर आलेले नाहीत. त्यांना मागील काही काळापासून जगाच्या नजरेपासून दूर ठेवलं आहे. त्यांना भेटण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. मोजतबा हे वडील अयातुल्ला खामेनी यांच्या अंत्ययात्रेतही सामील झाले नव्हते. दुसरीकडे इराणचं सरकारकडून मोजतबा खामेनी सुरक्षित असल्याचा वारंवार दावा केला जात आहे. त्यांना सुरक्षेच्या कारणात्सव बाहेर आणलं जात नसल्याचे कारण सरकारकडून दिलं जात आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?