AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाने इराणचे डोके आले ताळ्यावर, आयातुल्ला यांना मरण्यासाठी या 6 मित्रांनी एकटं सोडलं

इराणने या युद्धात इस्राईलशी लढता लढता हार किंवा जीत या पेक्षाही एक चांगला धडा घेतला असेल. इराणचा भरवसा कोणावर होता. आणि प्रत्यक्षात त्याला कोणी मदत केली. चला तर पाहूयात कोणी काय केले. आता इराणला त्याचे परराष्ट्र धोरण पुन्हा नव्याने ठरवावे लागणार आहे.

युद्धाने इराणचे डोके आले ताळ्यावर, आयातुल्ला यांना मरण्यासाठी या 6 मित्रांनी एकटं सोडलं
| Updated on: Jun 24, 2025 | 7:15 PM
Share

इराण आणि इस्राईलनच्या दरम्यान युद्धाची विरामाची घोषणा केली गेली आहे. दोन्ही देशांनी प्रचंड दबावाखाली सीजफायरची घोषणा केली आहे.परंतू या संपूर्ण संघर्षात इराण त्याच्या सच्च्या दोस्तांनी दगा दिला आहे. आता इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खामेनेई यांना एकट्यालाच सर्व आघाडीवर राहावे लागत आहे, या युद्धाने इराणचे डोके ताळ्यावर आले आहे.ज्यांच्यावर इराणला भरवसा होता त्या देश आणि संघटनांनी गप्प राहाणे पसंद केलेय किंवा पाठ दाखविली आहे.इस्राईलने इराणवर हल्ला करण्यापूर्वी त्याची भक्कम संरक्षकफळी आधी हमासवर हल्ला करुन नष्ट केली.

1. हेज बोलाह: अमेरिकेने प्रवेश करताच अंग काढले

इराणचा सर्वात वफादार म्हटला जाणारा हेजबोलाह याच्या आश्चर्यकारक वागण्याने इराणला धक्का बसला असेल. अमेरिकेवरील हल्ल्यानंतर हेजबोलाह बदला घेईल असे म्हटले जाते. परंतू त्यांच्या प्रवक्याने स्पष्ट केले की आम्ही इस्राईल किंवा अमेरिकेवर हल्ला करणार नाही. इराण स्वत:ला सांभाळण्यास सक्षम आहे. अमेरिकेने दखल घेण्यापूर्वी हेजबोलाह लढण्याच्या बाता करीत होता. आता अमेरिकेच्या एण्ट्रीने हेजबोलाह युद्धविराम आणि तटस्थतेचे धोरण राबवत आहे.

2. हमास: केवळ तोंडाची वाफ काढली,कोणतीही कारवाई नाही.

हमासने सुरुवातीला इस्राईलच्या विरोधात वक्तव्य केली असली तरी जेव्हा युद्ध वाढले तेव्हा इराणची मदत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.इराणसाठी हे साफ संकेत होते की केवळ भाषणाने युद्ध लढता येत नाही. हमासने कोणतीही भूमिका न घेण्यामागे एक हे ही कारण आहे की ७ ऑक्टोबर २०२३ च्या हमासच्या हल्ल्यानंतर इराणची सुरक्षा ढाल असलेल्या प्रत्येकाला इस्राईलला संपवले.

3. सीरिया: मित्र असूनही शत्रूला रस्ता दिला

सीरिया देखील इराण परंपरागत सहकारी मानला जातो. या वेळी देखील सिरीया फेल झाला आहे. इस्राईलने इराणी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी सिरीयाच्या हवाईहद्दीचा वापर केला. सिरीयातील नव्या सरकारने यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. आपल्या आकाशात शत्रूंच्या विमानांना उड्डाणाची परवानगी देणे कोणत्याही नात्याच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रकार आहे.

4. पाकिस्तान: कतार हल्लाचा विरोध, इराणशी फारकत

युद्धावेळी जरी पाकिस्तानने इस्राईली हल्ल्याच्या निषेध केला असला तरी जेव्हा इराण कतारमधील अमेरिकेचा अल-उदीद एअरबेस उद्धवस्त केला तेव्हा पाकिस्तानने इराणची बाजू न घेता कतारची बाजू घेतली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तर कतारच्या सोबत एकजुठ दाखविली. आणि इराणची बाजू घेतली नाही.

5. तुर्किये: शांततेच्या वार्तालापात चलाखी

तुर्किये नेहमीच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत राहीला.परंतू त्याने यावेळी अमेरिका आणिम इस्राईलविरोधात नरमाईचे धोरण व्यक्त केले. न इराणच्या बाजूने काही बोलला आणि विरोधात काही बोलला. शांततेच्या नावाखाली तुर्की तटस्थ राहून त्याने इराणला दगा दिलाच…

6. अफगानिस्तान: शरण येऊ पाहणाऱ्या दोस्ताला उघडं पाडलं

सर्वात आश्चर्यकारक तर तालिबान शासित अफगाणिस्तान इराणशी वागला. जेव्हा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स अधिकारी अफगाणिस्तानात शरण घेण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा तेथील गुप्तचर संस्था GDI ने इंटरनल मीटिंगच्या सगळ्या गोष्टी मीडियात लिक केल्या.यामध्ये इराणी सैन्य अधिकाऱ्यांसह अल-कायदाचे दहशतवादीही तिथे येण्याचा प्रयत्न करू शकतात हे देखील समाविष्ट होते. म्हणजेच, आश्रय देण्याऐवजी अफगाणिस्तानने इराणच्या कमकुवतपणा सार्वजनिक केला.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.