
इराणच्या युद्धाचा भारतावरही मोठा परिणाम झाला आहे. भारत रशिया आणि इराककडून इंधन घेत असतो. परंतू या युद्धात होर्मुज स्ट्रेटमधून जहाजांच्या वाहतूकीवर इराणने मोठे निर्बंध आणल्याने इराकने आता तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी इराकच्या जवळ अमेरिकन तेल टँकर जहाजावर इराणने ड्रोन बोटने हल्ला केला होता. यात एका भारतीय खलाशाच्या मृत्यू झाला होता. इराकच्या तेल मंत्री हयान अब्देल-गनी यांनी गुरुवारी सांगितले की फारसी खाडीतील संघर्षामुळे तेल निर्यातीचे मुख्य मार्ग सातत्याने बाधित होत आहेत.
पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटनेच्या ( OPEC ) अलिकडच्या आकडेवारीच्या मते स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून टँकरची वाहतूक प्रभावित होण्याआधी इराक प्रतिदिन ४ दशलक्ष बॅरलहून काही जादा तेलाचे उत्पादन करत होता. इराण युद्धा दरम्यान मध्य पूर्वेतील स्थिती खूपच प्रतिकूल होत जात आहे. दोनच दिवसांपूर्वी इराकच्या जवळ एका क्रुड ऑईल टँकरवर काम करणाऱ्या एका भारतीय मरीन इंजिनिअरचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. देवनंदन प्रसाद सिंह अमेरिकेच्या मालकीच्या टँकर ‘सेफसी विष्णू’ वर एडिशनल चीफ इंजिनिअर पदावर काम करत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की इराणच्या हल्ल्यानंतर देवनंदन प्रसाद सिंह गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृ्त्यू झाला.
इराकने मार्च २०२६ च्या मध्यापर्यंत कच्च्या तेलाचे उत्पादन अचानक घटवून सुमारे १.२ वरुन १.४ दशलक्ष बॅरल प्रतिदिन प्रतिदिन (bpd)केले आहे. इराक आधी सुमारे ४.३ दशलक्ष बॅरल प्रतिदिन प्रतिदिन तेलाचे उत्पादन घेत होता. त्याहून ७० टक्के कमी आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराणच्या दरम्यान सुरु असलेल्या संघर्षामुळे होर्मुज स्ट्रेट बंद होणे याची सर्वात मोठे कारण आहे.तेलाचा निर्यात मार्ग बंद झाल्यामुळे इराकच्या साठवण टाक्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचल्या आहेत, ज्यामुळे ऑपरेशनल ओव्हरफ्लोचा धोका टाळण्यासाठी इराकला उत्पादनात तात्काळ कपात करावी लागली आहे.
इराणच्या युद्धाने भारतात आधीच एलपीजीच्या तुटवडा निर्माण झाला आहे.आता इराकने तेलाचे प्रोडक्शनच्या ७० टक्क्यांपर्यंत घटल्याने टेन्शनची घटना आहे. इराक भारतासाठी एक महत्वपूर्ण आणि प्रमुख पातळीवरचा कच्च्या तेलाचा सप्लायर बनला आहे. इराक सातत्याने रशियासह भारताचे प्रमुख दोन पुरवठादारापैकी एक राहिला आहे. आणि २०२६ च्या सुरुवातीपर्यंत भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे १६.६ वाटा पुरवठा करत आहे.