AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेल डेपो, गॅस रिफायनरी अन् न्यूक्लियर प्लँट…, इस्त्रायलने इराणचा पाठीचा कणाच मोडला

इस्त्रायलने इराणमधील तेहरान येथील संरक्षण मंत्रालय, अण्वस्त्र निर्माण करणारी प्रयोगशाळा, न्यूक्लियर हेडक्वार्टर आणि दोन रिफाइनरी केंद्रांना लक्ष्य केले. हल्ल्यानंतर या ठिकाणांचे फोटो समोर आले.

तेल डेपो, गॅस रिफायनरी अन् न्यूक्लियर प्लँट..., इस्त्रायलने इराणचा पाठीचा कणाच मोडला
| Updated on: Jun 15, 2025 | 12:27 PM
Share

इस्त्रायल आणि इराण युद्ध चांगलेच पेटले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर वार-पलटवार करण्यात येत आहे. शनिवारी रात्रीही दोन्ही देशांनी तुफान हल्ले केले. इस्त्रायलने इराणच्या संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य केले. तसेच इराणमधील अनेक मोठे ऑईल डेपो, गॅस रिफायनरीवर क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे.

इस्त्रायलने इराणमधील तेहरान येथील संरक्षण मंत्रालय, अण्वस्त्र निर्माण करणारी प्रयोगशाळा, न्यूक्लियर हेडक्वार्टर आणि दोन रिफाइनरी केंद्रांना लक्ष्य केले. हल्ल्यानंतर या ठिकाणांचे फोटो समोर आले. त्यात मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे दिसत आहे. इराणमध्ये रविवारी सकाळी अनेक ठिकाणी सायरन वाजत आहे. यरुशलम आणि तेल अवीवसारख्या मोठ्या शहरात सायरनचे सतत आवाज ऐकू येत आहे. इराण सातत्याने तेल अवीवला लक्ष्य करत आहे. इस्त्रायल इराणचे सर्व अण्वस्त्र केंद्र नष्ट करण्याच्या तयारीत आहे.

इस्त्रायल संपूर्ण नियोजनासह इराणचा पाठीचा कणाच मोडत आहे. सर्वात आधी इस्त्रायलने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला केला. त्यानंतर इराणचे तेल डेपो आणि गॅस रिफायनरी प्रकल्पांना लक्ष्य केले. तेहरानजवळील शाहरान ऑयल डिपोला लक्ष्य केले. यापूर्वी बुशहर शहरातील गॅस फील्ड आणि अबादान येथील ऑयल रिफायनरीवर हल्ला केला. इराणच्या एका बंदरावरही हल्ला केल्याचे वृत्त आहे.

इस्त्रायलने इराणच्या फज्र गॅस रिफायनरी केंद्रावर हल्ला केला. हे केंद्र जगातील सर्वात मोठे प्राकृतिक गॅस भंडार आहे. या रिफायनरीमधून 125 मिलियन क्यूबिक मीटर गॅसवर प्रक्रिया होते. मागील 48 तासांत इराणने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यात 130 जणांचा मृत्यू झाला. त्यात नऊ अणू शास्त्रज्ञ आहे. जखमींची संख्या 300 पेक्षा जास्त आहे. इस्त्रायलने तेहरानमध्ये केलेल्या हल्ल्यात एका गगनचुंबी इमारतीमधील 29 मुलांसह 60 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवरील हल्ले वाढवण्याचे वक्तव्य केले आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यास उत्तर देत इराणकडून हल्ले केले जात आहे. इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.