Israel Attack Iran : Air Strike मध्ये इराणच्या जिव्हारी लागणारा वार, इस्रायलने थेट रिवोल्यूशनरी गार्ड चीफला उडवलं
Israel Attack Iran : अणूबॉम्ब बनवण्याच्या मागे लागलेल्या इराणला इस्रायलने आज मोठा धक्का दिला आहे. इस्रायलने इराण विरोधात 'ऑपरेशन रायजिंग लायन' सुरु केलं आहे. "इस्रायलच्या अस्तित्वाला जेव्हा कधी धोका निर्माण होईल, तेव्हा इराणवर हल्ले करण्यात येतील" असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलय.

इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणची राजधानी तेहरानमध्ये बॉम्बवर्षाव केला. इराणने सुद्धा इस्रायल विरोधात प्रत्युत्तराची कारवाई सुरु केली आहे. दोन्ही देशात युद्धासारखी स्थिती आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर हल्ला आणि पलटवार सुरु आहे. त्यामुळे या क्षेत्रात तणाव वाढला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड चीफ हुसैन सलामीचा मृत्यू झाला. प्राथमिक रिपोर्टनुसार इराणचे बडे लष्करी अधिकारी या हल्ल्यात रडारवर होते. इस्रायलने इराण विरोधात केलेल्या या कारवाईला को ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ नाव दिलं आहे. इराणवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने संभाव्य प्रतिहल्ल्याचा धोका लक्षात घेऊन देशभरात इमर्जन्सी घोषित केली आहे. इराणकडून इस्रायलवर ड्रोन आणि मिसाइल हल्ला होऊ शकतो. इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर आहेत. सीमेवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिस्थिती खूपच संवेदनशील आहे.
इराणसाठी अणूबॉम्ब बनवणाऱ्या वैज्ञानिकांना टार्गेट करण्यात आलं, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं. या हल्ल्यानंतर राष्ट्राला बेंजामिन नेतन्याहू यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, “या हल्ल्यात प्रामुख्याने इराणच्या अणू बॉम्ब बनवण्याच्या तळांना टार्गेट करण्यात आलं. सोबतच इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅम सेंटरवर हल्ला केला”
‘इस्रायलला याची कठोर शिक्षा मिळेल’
“इस्रायलच्या अस्तित्वाला जेव्हा कधी धोका निर्माण होईल, तेव्हा इराणवर हल्ले करण्यात येतील” असं नेतन्याहू म्हणाले. “इस्रायली जनतेच्या सुरक्षिततेसाठी हे ऑपरेशन आवश्यक होतं” असं बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराण सरकारने वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. स्थानिक मीडियानुसार, या हल्ल्यानंतर राजधानी तेहरानमध्ये लोकांमध्ये घबराट पसरली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली ख़ामेनेई यांनी हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना इस्रायलला याची कठोर शिक्षा मिळेल असं म्हटलं आहे.
इराणचा अमेरिकेला इशारा काय?
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितलं की, ‘इस्रायलने अमेरिकेला सांगितल होतं, ही कारवाई आवश्यक आहे’ अमेरिकेने स्पष्ट केलय की, या कृतीमध्ये त्यांची काही भूमिका नाहीय. इस्रायलची मदत करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल असं इराणने म्हटलं आहे.