AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | तिचा शेवटचा कॉलच तिच्यापर्यंत पित्याला घेऊन गेला, पण खूप उशीर झाला होता…

ती कॅलिफोर्नियात वाढलेली तर तो इस्रायलमध्ये त्यांची ओळख आर्मीत झाली. लवकरच ते लग्न करणार होते. परंतू त्या म्युझिक पार्टीला ते गेले ते परतलेच नाहीत. एका पित्यानं आपल्या मुलीच्या भावी आयुष्याचं स्वप्न अतिरेक्यांच्या गोळ्यांनी छिन्नविछिन्न होताना पाहिलं

Israel-Hamas War | तिचा शेवटचा कॉलच तिच्यापर्यंत पित्याला घेऊन गेला, पण खूप उशीर झाला होता...
NOVA FESTImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 16, 2023 | 7:18 PM
Share

तेल अवीव | 16 ऑक्टोबर 2023 : माझी मुलगी खूप आनंदी असायची, ती सर्वांना आवडायची. तिच्या बॉयफ्रेंड सोबत ती लवकरच लग्न करणार होती. परंतू त्या सुपरनोवा म्युझिक फेस्टीव्हलला पाहण्यासाठी ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत गेली आणि हमासचा हल्ला झाला. तिच्या शेवटचा कॉल आधारे तिच्या मृत्यूचे ठीकाण शोधणारे तिचे वडील कंप्युटर नेटवर्कचे मल्टी नॅशनल सप्लायर इयाल वाल्डमन सांगत होते. 24 वर्षीय डॅनियल वाल्डमन ही तरुणी दक्षिण इस्रायलमध्ये आयोजित केलेल्या सुपरनोवा म्युझिक फेस्टीव्हलला अटेंड करायला तिच्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती.

सुपरनोवा म्युझिक इवेंटमध्ये रेव्हपार्टी सुरु असताना हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबरला हल्ला करुन अक्षरश: मृत्यूचा नंगानाच घडविला. 260 हून अधिक लोकांना एकट्या याच ठिकाणी हमासने अगदी वेचून ठार केले. याच ठिकाणाहून हमासने अनेकांचे अपहरण केले आहे. सुरुवातीला वाल्डमन यांना आशा होती की आपल्या मुलीचे अपहरण झाले असावे. पण ती आशा अखेर फोलच ठरली.

इस्रायल येथे विमानाने उतरल्यानंतर तीन तासांनंतर आपल्या दक्षिण दिशेला तिची कार सापडली. तेथे दोघे निपचित पडले होते असे वाल्डमन यांनी एका चॅनलला गुरुवारी सांगितले. मला तिचा एक इमर्जन्सी कॉल आला होता. त्या कॉलचा मागोवा घेत आयफोन आणि एपल वॉचच्या क्रॅश कॉल फिचरमुळे आपल्या मुलीचे नेमके ठिकाण शोधता आल्याचे ते म्हणाले. आयटी मल्टीनॅशनलचे मेलानॉक्स कंपनीचे संस्थापक असलेले वाल्डमन म्हणाले की माझी मुलगी तिचा बॉयफ्रेंड नओम शाय बरोबर लाईफ एन्जॉय करायला पार्टीत सामील झाले होते. ती आनंदी होती. सर्वजण तिचे लाड करायचे.

दोन्ही दिशेने गोळीबार

त्या दोघांची इस्रायल आर्मीत भेट झाली. ते एकत्र जीवन जगणार होते. लवकरच लग्न करणार होते. एका डॉगसह ते दोघे नुकतेच एका नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. आम्हाला तेथे घटना स्थळी सापडलेल्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्यावरुन असे समजले की कमीत कमी तीन ते पाच जणांनी दोन्ही दिशेने त्यांच्यावर गोळीबार केला असावा असे तिच्या वडीलांनी दु:खी अंतकरणाने सांगितले. इस्रायलवर हमासने केलेल्या या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायली ठार झाले आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.