AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | किबुत्जमध्ये हमासकडून लहान बाळांबरोबर अत्यंत नीच हरकत, ऐकूनच काळाजाच उडेल थरकाप

Israel-Hamas War | लहान बाळांबरोबर हमासच्या दहशतवाद्यांनी जे केलं, ते खूपच भयानक आहे. वाचल्यानंतर काळाजाचा थरकाप उडेलच पण हमासच्या दहशतवाद्यांबद्दल तळपायाची आग मस्तकात जाईल.

Israel-Hamas War | किबुत्जमध्ये हमासकडून लहान बाळांबरोबर अत्यंत नीच हरकत, ऐकूनच काळाजाच उडेल थरकाप
Israel Hamas War kibbutz Kfar Aza Image Credit source: AFP
| Updated on: Oct 11, 2023 | 10:00 AM
Share

जेरुसलेम : हमासने शनिवारी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला. इस्रायल-हमासच्या आतापर्यंतच्या संघर्षातील हा सर्वात भीषण अध्याय आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून अक्षरक्ष: अत्याचार केले. हमासकडून यावेळी नागरिवस्त्यांना थेट टार्गेट करण्यात आलं. हमासच्या दहशतवाद्यांनी जे गुन्हे केले, ते किती भयानक होते, माणुसकीला काळीमा फासणारे आहेत, ते आता हळूहळून समोर येऊ लगालय. किबुत्ज दक्षिण इस्रायलमध्ये आहे. तिथल्या कफर अजा गावात हमासच्या 70 दहशतवाद्यांनी हैदोस घातला. कफर अजाने या भीषण हल्ल्याची झळ सोसली. गाझा पट्टीपासून कफर अजा अवघ्या 3 किलोमीटरवर आहे. हमासच्या दहशतवाद्यांची क्रूरता पाहून घटनास्थळावर असलेले इस्रायली अधिकारी आणि पत्रकारांना मोठा धक्का बसला.

किबुत्ज कफर अजामध्ये हमासच्या 70 दहशतवाद्यांनी लहान मुलांची आणि 40 बाळांची अत्यंत निदर्यतेने हत्या केली. इथली दृश्य काळाजाचा थरकाप उडवणारी आहेत. राग, द्वेष आणि क्रूरता डोक्यात ठेऊन आलेल्या या दहशतवाद्यांनी लहान बाळांच शिरकाण केलं. त्यांचा शिरच्छेद केला. “हे युद्ध नाही, नरसंहार आहे. आई, वडिल, लहान बाळं, कुटुंबातील सदस्यांची बिछान्यातच हत्या करण्यात आली. गार्डन, जेवणाच्या खोलीत, हॉलमध्ये जिथे मिळेल, तिथे या दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांची हत्या केली” असं इस्रायली संरक्षण दलाचे प्रमुख जनरल इटाई वीरुव यांनी सांगितलं. मागच्या 40 वर्षात मी असं काही पाहिलं नव्हतं, असं ते म्हणाले. बचावलेल्या व्यक्तीचा अनुभव खूपच भयानक

कफर अजामध्ये बचावलेल्या एका व्यक्तीचा सांगितलेला अनुभव खूपच भयानक आहे. “मी, माझी पत्नी आणि एक वर्षाची मुलगी सुरक्षित खोलीत लपून राहिलो. तब्बल 20 तासानंतर इस्रायली सैनिकांनी आमची सुटका केली. बाहेर आलो, तेव्हाच दृश्य खूपच विदारक, भयानक होतं. सर्वत्र मृतदेह पडलेले होते. आमच छोटस विश्व उद्धवस्त झालं होतं. सर्वत्र रक्त दिसत होतं” असं त्या व्यक्तीने सांगितलं. अनेक कुटुंबांना गोळीबारात संपवण्यात आलं. लहान बाळांचा शिरच्छेद करण्यात आला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.