AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | थेट रुग्णालयावरच एअर स्ट्राईक; इस्रायलच्या हल्ल्यात 500 नागरिक ठार

इस्रायल आणि हमासच्या युद्धाचा आज 12 वा दिवस आहे. इस्रायलने गाजापट्टीतील एका रुग्णालयावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 500 नागरिक ठार झाले आहेत. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Israel-Hamas War | थेट रुग्णालयावरच एअर स्ट्राईक; इस्रायलच्या हल्ल्यात 500 नागरिक ठार
Gaza hospitalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2023 | 8:25 AM
Share

तेल अविव | 18 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासमधील युद्ध आता शिगेला पोहोचलं आहे. इस्रायलने हमासवर ग्राऊंड लेव्हलवर अजूनही हल्ले सुरू केलेले नाहीत. मात्र, इस्रायलने एअर स्ट्राईकवर भर दिला आहे. इस्रायलने थेट गाजा पट्टीतील एका रुग्णालयावर एअर स्ट्राईक केला असून त्यात 500 लोक दगावले आहेत. युद्धात रुग्णालयांनाही टार्गेट केलं जात असल्याने जगभर खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे जगात नाचक्की होण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने इस्रायलने आपण रुग्णालयावर हल्लाच केला नसल्याचा दावा केला आहे. हमासच्या अतिरेक्यांनीच रुग्णालयात स्फोट घडवून आणल्याचं इस्रायलने म्हटलं आहे.

इस्रायलनेच हा एअर स्ट्राईक केल्याचा दावा हमासने केला आहे. इस्रायलच्या लष्कराने मध्य गाजातील अल अहली रुग्णालयावर हल्ला केला. गाजा पट्टीतील हे शेवटचं ख्रिश्चन रुग्णालय असल्याचं सांगितलं जात आहे. हमासच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या लष्कराने अल अहली अबरी बाप्टिस्ट रुग्णालयात संध्याकाळी एअर स्ट्राईक केला. त्यात 500 हून अधिक लोक ठार झाले आहेत. तर दुसरीकडे जॉर्डनमध्ये इस्रायली दुतावासावर हल्ला झाल्याचंही वृत्त आहे.

हमासकडूनच मिस फायर

दरम्यान इस्रायलच्या सैन्याने अल अहली अबरी बाप्टिस्ट रुग्णालयावर एअर स्ट्राईक केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. हमासचं रॉकेट मिस फायर झालं. त्यामुळे रुग्णालयात स्फोट झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या रुग्णालयात हमासची शस्त्रास्त्रं होती. हमासच्या रॉकेटचं मिस फायर झाल्याने ही दुर्घटना घडल्याचंही इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे.

मुलं आणि महिलांचा मृत्यू

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये रुग्णालयातील 500 लोक दगावल्याचा दावा पॅलेस्टाईनने केला आहे. हा हल्ला इस्रायलनेच केल्याचा दावाही पॅलेस्टाईनने केला आहे. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्याप्रमाणावर समावेश आहे. या हल्ल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती.

आजची रात्र कयामतची

रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याने हमासचे अतिरेकी खवळले आहेत. त्यांनी थेट इस्रायललाच इशारा दिला आहे. आजची रात्र कयामतची रात्र असल्याचं हमासने म्हटलं आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये मोठा हल्ला घडवून आणण्याचा हमासचा इरादा असल्याचंही स्पष्ट झालं आहे. हमासने आता नागरिकांना या युद्धात उतरण्याचं आवाहन केलं आहे. मृत्यूचा बदला मृत्यूने घेतला जाईल. आता आरपारची लढाई होणार असल्याचं हमासने म्हटलं आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. ईराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कनानी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्यात शेकडो आजारी लोक मारले गेले आहेत. नि:शस्त्र लोकांवर हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात अनेक निरपराध लोक शहीद झाले आहेत. काही लोक जखमी झाले आहेत, असं कनानी यांनी म्हटलं आहे. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही या हल्ल्याचा निषेद नोंदवला आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचं समर्थन करता येणार नाही, असं त्यंनी म्हटलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.