AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : मानलं इस्रायलला, पावसाचा अलर्ट तसा मोबाइलवर येतो मिसाइल हल्ल्याचा अलर्ट, काय आहे टेक्नॉलॉजी?

Israel Iran War : इस्रायल एक छोटासा देश असला तरी भविष्याच्या दृष्टीने विचार करुन अनेक गोष्टी केल्या जातात. इराण बरोबर सुरु असलेल्या युद्धा दरम्यान लोकांचे प्राण वाचवण्यासाठी इस्रायलने उत्तम टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

Israel Iran War : मानलं इस्रायलला, पावसाचा अलर्ट तसा मोबाइलवर येतो मिसाइल हल्ल्याचा अलर्ट, काय आहे टेक्नॉलॉजी?
Iran hit Israel
| Updated on: Jun 23, 2025 | 3:34 PM
Share

इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांचे परस्परांवर हल्ले सुरु आहेत. इस्रायली डेवलपर्सनी इराणच्या हल्ल्यापासून सर्वसामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी एका खास सिस्टिम तयार केली आहे. या सिस्टिमद्वारे स्थानिक इस्रायली जनतेला मोबाइलमध्ये रियल टाइम अलर्ट मिळतो. जेणेकरुन हल्ल्याआधी प्राण वाचवण्यासाठी ते शेल्टरमध्ये पळू शकतात. या बद्दल डिटेल्समध्ये जाणून घ्या. इस्रायली डेवलपर्सनी जनतेच्या सुरक्षेसाठी Android आणि iOS साठी एक खास APP बनवलं आहे. हा APP लोकेशन बेस्ड अलर्ट आणि सेफ्टी गाइडलाइन्स जारी करतो.

मोबाइल APP च्या माध्यमातून लोकांना ही माहिती मिळते. मोबाइलवर वेगाने अलर्ट वाजू लागतो. हे मोबाइल APPS लोकांच्या सुरक्षेसाठी पूर्णवेळ अलर्ट मोडवर असतात. Red Alert, Home Front Command App आणि Tzofar Red Alert अशी या APPS ची नाव आहेत. बहुतांश APPS थर्ड पार्टी डेवेलपर्सची आहे. Home Front Command हे ऑफिशियल APP आहे. दोन्ही Apps आता IOS आणि Android प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. Red Alert APP 2-3 मिनिटं आधी माहिती देतो. अनेकदा काही लोकेशन्सवर 10 मिनिटं आधी माहिती मिळते.

Red Alert App मध्ये अनेक खास फिचर्स

Red Alert App मध्ये अनेक खास फिचर्स आहेत. हे APP इन्स्टंट नोटिफिकेशन देतो. ऑफिशियल सोर्सकडून माहिती घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. हा APP लोकांचे प्राण वाचवण्याच काम करतोय.

कशी काम करते ही सिस्टिम?

Iron Dome, David Sling आणि Arrow या इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमकडून ऑफिशियल APP ला डेटा मिळतो. मिसाइलची ट्रेजेक्ट्री काय आहे? कुठल्या जागेवर मिसाइल पडणार? याचा अंदाज स्वत: App लावू शकत नाही. म्हणून हे App रडार डेटाच्या माध्यमातून रियल टाइम काम करतो. उदहारणार्थ इराणने मिसाइल लॉन्च केलं. इस्रायली एअर स्पेसमध्ये या मिसाइलची एन्ट्री होताच, इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम एक्टिव होते आणि या Apps वर नोटिफिकेशन येतात. हे नोटिफिकेशन 100 टक्के अचूक नसतात. पण हल्ल्याआधी वॉर्निंग मिळेत. त्यामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....