AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Iran War : Pizza ची विक्री वाढताच युद्धाला फुटते तोंड, युद्धाशी काय कनेक्शन? बसेल आश्चर्याचा धक्का

Israel-Iran War And America : 12-13 जूनच्या रात्री जेव्हा इस्त्रायने इराणवर ‘ऑपरेशन लॉयन’ अंतर्गत हवाई हल्ले सुरू करण्याची तयारी केली. तेव्हा अमेरिकेत पिझ्झा विक्री अचानक वाढली. काय आहे त्याचे युद्धाशी कनेक्शन?

Israel-Iran War : Pizza ची विक्री वाढताच युद्धाला फुटते तोंड, युद्धाशी काय कनेक्शन? बसेल आश्चर्याचा धक्का
पिझ्झाचे युद्धाशी काय कनेक्शनImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 19, 2025 | 8:56 AM
Share

Pizza And War : 12 आणि 13 जून रोजी रात्री इस्त्रायने इराणवर ‘ऑपरेशन लॉयन’ अंतर्गत जोरदार हवाई हल्ले चढवले. तेव्हा अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील आर्लिंगटन शहरात एक मोठी घडामोड घडत होती. येथे युद्धाशी संबंधित धावपळ स्पष्ट दिसत होती. खासकरून पेंटागन हे अमेरिकेचे संरक्षण मुख्यालयाजवळील धावपळ तर यु्द्धाची मोठी तयारी सुरू असल्याचे खुणावत होती. कारण या मुख्यालयाजवळील सर्व पिझ्झा आऊटलेट्समध्ये अचानक पिझ्झाची ऑर्डर वाढली. पिझ्झाची ऑर्डर वाढली म्हणजे युद्धाचे ढग गडद झाल्याचे मानण्यात येते. काय आहे पिझ्झा आणि युद्धाचे कनेक्शन?

युद्ध भडकण्याची चिन्ह असेल तर पेंटागन जवळील पिझ्झा आऊटलेट्समध्ये मोठी गडबड, गोंधळ उडतो. कारण येथे सातत्याने पिझ्झाची ऑर्डर देण्यात येते. यापूर्वी सुद्धा पेंटागन जवळील पिझ्झाच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली होती. हे जागतिक संकटाचे, मोठ्या युद्धाचे संकेत आहेत. Pentagon Pizza Index नावाचे एक्सवर एक अकाऊंट आहे. या खात्यावरून नियमीतपणे पिझ्झा ऑर्डर्सवर लक्ष्य ठेवण्यात येते. जागतिक वृत्तसंस्था अमेरिकेची कोणत्या युद्धात काय भूमिका असेल याविषयीचा अंदाज या पिझ्झा ऑर्डरवरून पण लावतात. पिझ्झा ऑर्डर जितक्या अधिक प्रमाणात असेल, तितके युद्ध अधिक भडकण्याची शक्यता असते.

13 जून रोजी रात्री जवळपास 6:59 वाजता ET वर Pentagon Pizza Report ने पोस्ट केली की, पेंटागनच्या जवळपास सर्व पिझ्झा स्टोरवर सर्वाधिक गर्दी दिसत आहे. इतकेच नाही, रात्री 11 वाजेच्या दरम्यान डोमिनोज आऊटलेटमध्ये पण नेहमीपेक्षा खूप अधिक गर्दी दिसली. आता विश्लेषक त्याचा युद्धाशी संबंध जोडत आहे. कदाचित अमेरिका इराणवर भीषण हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिका इराणवर अणुप्रकल्पाविषयीची माहिती देण्याविषयी दबाव टाकत आहे. इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिका उडी घेण्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत.

शीत यु्द्धाशी पिझ्झाचे गणित

पिझ्झा आणि युद्धाचे हे कनेक्शन फार जुने आहे. शीत युद्धाच्या काळात (Cold War) सोव्हिएत रशियासोबत अमेरिकेच्या सतत कुरबुरी सुरू होत्या. त्यावेळी वॉशिंग्टन डीसीमध्ये अचानक पिझ्झाची डिलिव्हरी वाढली होती. त्यानंतर 1 ऑगस्ट 1990 मध्ये CIA च्या इमारतीत मोठ्या संख्येने पिझ्झा मागवण्यात आला. दुसऱ्याच दिवशी इराकने कुवैतवर हल्ला चढवला. 1991 मध्येऑपरेशन डेज़र्ट स्टॉर्मवेळी सुद्धा हेच पॅटर्न दिसून आले होते. Pentagon Pizza Index आणिOSINT (Open Source Intelligence) अकाऊंट्सवरून पिझ्झाबाबतची अपडेट देण्यात येते. त्यासाठी Google Maps आणि लाईव्ह डेटाचा वापर करण्यात येतो.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....