Iran Israel War: खमेनी कुठे लपलेत आम्हाला माहिती आहे, आम्ही त्यांना आत्ताच मारणार…, ट्रम्प यांचा गंभीर इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते खमेनी हे कुठे लपलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते खमेनी हे कुठे लपलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच खमेनी आमच्यासाठी सोपे टार्गेट आहे असंही म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘इराणचा सर्वोच्च नेता कुठे लपला आहे हे आम्हाला माहिती आहे. ते आमच्यासाठी एक सोपे टार्गेट आहे, पण तिथे ते सुरक्षित आहे. आम्ही त्यांनी तिथून बाहेर काढणार नाही. आम्ही त्यांना आत्ताच मारणार नाही. पण आम्हाला नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. आमचा संयम संपत चालला आहे.’
या युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे इराण आणि त्यांचे सर्वोच्च नेते खमेनी यांची चिंता वाढवणार आहे. असे बोलले जात आहे की, इस्रायल आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने रझा पहलवी इराणी सिंहासनावर बसण्याची शक्यता आहे. पहलवी यांनी एक पोस्ट देखील केली आहे. यामध्ये त्यांनी, “रात्री 9 वाजता इराणी राष्ट्राला एक संदेश मिळेल.”
इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला
ट्रम्प यांचा इशारा आणि रेझा पहलवी यांच्या पोस्टदरम्यान, इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहे. ही क्षेपणास्त्रे जॉर्डन, लेबनॉन आणि सीरियाच्या दिशेकडून डागण्यात आली आहेत. द टाईम्स ऑफ इस्रायलमधील एका वृत्तानुसार, इस्रायली हवाई दलाने इराणमध्ये आयडीएफ मोहिमेला सुरुवात झाल्यापासून 70 हवाई संरक्षण बॅटरी नष्ट केल्या आहेत.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांची मोठी घोषणा
इस्रायल-इराण युद्धाबाबत अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, ट्रम्प इराणविरुद्ध पुढील कारवाईचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आता ट्रम्प नेमका काय निर्णय घेणार हे येणारा काळ ठरवणार आहे.