AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran vs Israel : इस्रायलच्या रक्षणासाठी एक मुस्लिम देश पुढे आला, इराण विरुद्ध छातीचा कोट करुन उभा आहे

Iran vs Israel : इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने बदला घेण्याची शपथ घेतली आहे. पण त्यासाठी त्यांना एका मुस्लिम देशाचा अडथळा पार करावा लागणार आहे. हा मुस्लिम देश आज इस्रायलसाठी छातीचा कोट करुन उभा आहे. इस्रायलने आज इराणध्ये घुसून त्यांचे सैन्य आणि अण्विक तळ नष्ट केले.

Iran vs Israel : इस्रायलच्या रक्षणासाठी एक मुस्लिम देश पुढे आला, इराण विरुद्ध छातीचा कोट करुन उभा आहे
Iran vs Israel
| Updated on: Jun 13, 2025 | 2:39 PM
Share

इस्रायल एक ज्यू राष्ट्र आहे. इस्रायलबद्दल अनेक मुस्लिम देशांच्या मनात राग आहे. इस्रायलविरोधात आतापर्यंत अनेक मुस्लिम देशांनी आघाड्या केल्या. इस्रायलविरोधात हे मुस्लिम देश एकत्र येऊन लढले. आता इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झालीय. इस्रायलने इराणमध्ये घुसून त्यांचे सैन्य आणि अण्विक तळ नष्ट केले आहेत. त्यामुळे इराणची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. काहीही करुन त्यांना बदला घ्यायचा आहे. इस्रायलला धडा शिकवायचा आहे. पण यामध्ये एका मुस्लिम देशाचा प्रामुख्याने अडथळा आहे. हा मुस्लिम देश इराणचा कट्टर शत्रू आहे आणि हाच मुस्लिम देश आज इस्रायलच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करुन उभा राहिला आहे.

इराणला बदल्याची कारवाई करायची आहे. पण जॉर्डनने इराणच्या मार्गात खो घातला आहे. इस्रायलवर हल्ला करण्याआधी इराणला जॉर्डनला पार कराव लागणार आहे. इराणने इस्रायलवर केलेले सर्व ड्रोन स्ट्राइक जॉर्डनने आपल्या एअरस्पेसमध्येच रोखले. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इराणला आम्ही आमच्या एअरस्पेसचा वापर करु देणार नाही असं जॉर्डनच म्हणणं आहे. जॉर्डनच्या स्थानिक मीडियानुसार, त्यांच्या सरकारने आपला एअरस्पेस बंद केला आहे. संपूर्ण देशात सायरन अलर्ट जारी केला आहे. सौदी अरेबिया, कतर आणि यूएई या आखाती देशांनी इस्रायलची निंदा केलेली असताना जॉर्डनने हे पाऊल उचललं आहे.

इस्रायलकडून आर्थिक लाभ मिळतो

जॉर्डन एक सुन्नी मुस्लिम बहुल देश आहे. इथे जवळपास 97 टक्के सुन्नी मुस्लिम राहतात. इराण एक शिया मुस्लिम देश आहे. इथे शिया समुदायाची लोकसंख्या 90 टक्के आहे. 1980 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती सुरु झाली. त्यावेळी जॉर्डन आणि इराणमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. इराण विरुद्ध इराक युद्धादरम्यान जॉर्डनने इराकची साथ दिली होती. त्यानंतर इराण आणि जॉर्डनचे संबंध कधी सुधरले नाहीत. दुसरीकडे जॉर्डनला इस्रायलकडून आर्थिक लाभ मिळतो. जॉर्डनच सर्व सामना इस्रायलच्या माध्यमातू तुर्की आणि युरोपला जातं. जॉर्डन त्यासाठी इस्रायलच्या हायफा बंदराचा वापर करतो.

दोन आघाड्यांवर युद्ध लढावं लागेल

इराणला एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढावं लागेल. इराण थेट इस्रायलवर हल्ला करु शकत नाही. त्यासाठी इराणला इराक आणि जॉर्डनच्या एअरस्पेसचा वापर करावा लागेल. जॉर्डनने आपल्या इथेच इराणला रोखलं, तर इराणसाठी झटका असेल.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.