Iran Israel War : इस्रायलमध्ये अशा ठिकाणी हल्ला…नेतन्याहू प्रचंड खवळले, बोलले इराणला याची किंमत चुकवावी लागेल
Iran Israel War : इस्रायल इराण युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या इशाऱ्यानंतर हे युद्ध अजून भडकणार हे स्पष्ट आहे. इराण मागच्या काही दिवसांपासून इस्रायलमधल्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहे. पण इराणने आता अशा ठिकाणी हल्ला केलाय, त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू प्रचंड चिडले आहेत.

इस्रायल-इराणमध्ये सुरु असलेल युद्ध दिवसेंदिवस भीषण बनत चाललं आहे. आज या युद्धाचा सातवा दिवस आहे. अमेरिकेकडून सध्या फक्त धमकी देण्याच सत्र सुरु आहे. अजून अमेरिकेने या युद्धात उडी घेतलेली नाही. इस्रायल आणि इराणकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरु आहेत. या युद्धामध्ये इराणने अशा ठिकाणी हल्ला केलाय की, त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू प्रचंड खवळले आहेत. इराणला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. युद्धाचे काही नियम असतात. इस्रायलकडून सध्या फक्त इराणचे लष्करी तळ, अणवस्त्र प्रकल्प आणि तेल विहिरींना लक्ष्य केलं जातय. पण इराण नागरीवस्त्यांना लक्ष्य करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना मारण्याचा इराणचा प्रयत्न आहे.
इस्रायलवरील इराणच्या ताज्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खामेनेई प्रशासनाला कठोर शब्दात इशारा दिला आहे. इस्रायलमधील सरोका रुग्णालय आणि अन्य नागरिक वस्त्यांवर इराणने बॅलेस्टिक मिसाइलद्वारे हल्ले केले. रुग्णालयावर झालेल्या या हल्ल्यानंतर तिथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. बेंजामिन नेतन्याहू या हल्ल्यानंतर प्रचंड चिडले आहेत. “इराणचा दहशतवादी हुकूमशाह (अयातुल्ला अली खामेनेई) च्या सैनिकांनी सरोका रुग्णालय आणि नागरिक वस्त्यांवर हल्ले केले. आता इराणला याची किंमत चुकवावी लागेल” असं नेतन्याहू यांनी एक्सवर लिहिलय.
एकाचवेळी 40 फायटर जेटमधून हल्ला
इस्रायल आणि इराण दोन्ही देश परस्परांवर मिसाइल्सचा पाऊस पाडत आहेत. आज इस्रायलच्या 40 फायटर जेट्सनी इराणच्या तेहरानसह अनेक शहरांवर मोठे हल्ले केले. अराक रिएक्टरवर बॉम्बवर्षाव केला. त्यानंतर इराणने इस्रायलच्या सरोका हॉस्पिटलवर हल्ला केला. हल्ल्यानंतर सरोक हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला. लोक पळताना दिसत होते. IDF ने बुधवार-गुरुवारच्या रात्री तेहरानसह अन्य भागांमध्ये भीषण बॉम्बवर्षाव केला. इस्रायलने अराक अणूभट्टीला सुद्धा लक्ष्य केलं. गुप्तचर यंत्रणांच्या अचूक माहितीनंतर आमच्या 40 फायटर जेट्सनी 100 पेक्षा जास्त ठिकाणी दारुगोळ्यासह हल्ला चढवला.
