जगातील देशांनो सावध राहा… अमेरिका आणि इस्रायलचा नवा गेम प्लान तयार? नेतन्याहूंचं ते विधान चक्रावणारं
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे जगात खळबळ उडाली आहे. नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलचे आतापर्यंतचे सर्वात मोठे मित्र आहेत असं विधान केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. अशातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे जगात खळबळ उडाली आहे. नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलचे आतापर्यंतचे सर्वात मोठे मित्र आहेत असं विधान केले आहे. अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये पॅलेस्टाईनला प्रतीकात्मक मान्यता देण्याबाबत चर्चा सुरु आहे, त्यामुळे इस्रायलवरील दबाव वाढला आहे. याच काळात हे विधान आल्याने अमेरिका आणि इस्रायलमध्ये नक्कीच काहीतरी शिजत असल्याचे बोलले जात आहे.
नेतन्याहू यांच्या विधानाने चिंता वाढली
युरोपियन देश इस्रायलवर दबाव टाकत आहेत, मात्र याच काळात इस्रायलने ट्रम्प यांचा उल्लेख जवळचा मित्र म्हणून केला आहे. या विधानामुळे, अमिरेका इस्रायलच्या सोबत आहे असं स्पष्ट होत आहे, त्यामुळे इस्रायलवरील दबाव कमी होऊ शकतो. यातून इस्रायलचा अमेरिकेवर विश्वास असल्याचेही स्पष्ट होत आहे, तसेच आगामी काळात हे दोन्ही देश जगासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
रुबियो यांचा इस्रायल दौरा
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा इस्रायल दौरा ही सध्या चर्चेत आहे. रुबियो यांनी गाझा युद्धात अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘गाझामध्ये हमास पूर्णपणे संपेपर्यंत शांतता शक्य नाही. गाझाच्या लोकांना चांगले भविष्य मिळायला हवे, परंतु ते तेव्हाच शक्य आहे, जेव्हा हमासचा नाश होईल.’ तसेच मार्को रुबियो यांनी म्हटले की, पाश्चात्य देशांनी इस्रायलला विरोध केल्यास काहीही फरक पडत नाही, मात्र यामुळे हमासला प्रोत्साहन मिळते.
कतारबाबतही वाद
इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथील हमासच्या बड्या नेत्यांवर हवाई हल्ला केला होता, याच काळात रुबियो यांनी इस्रायलला भेट दिली आहे. कतार हा अमेरिकेचा जवळचा मित्र आहे, तसेच अमेरिकेचा सर्वात मोठा हवाई तळ येथे आहे. मात्र या हल्ल्यामुळे अमेरिका-कतार यांच्यातील तणाव वाढला आहे. यामुळे ट्रम्प यांनी इस्रायलने हल्ला करताना सावधगिरी बाळगली पाहिजे असं विधान केलं आहे.
अमेरिका-इस्रायलचे समीकरण
नेतान्याहू हे ट्रम्प यांना सर्वात मोठा मित्र म्हणून अमेरिकेचा पाठिंबा आणखी मजबूत करू इच्छित आहेत. तसेच आता रुबियो यांच् दौऱ्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मजबूत संदेश दिला आहे. त्यामुळे आगामी काळात इस्रायलच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या देशांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण हे दोन्ही देश शक्तिशाली आहेत. ते जगातील अनेक देशांसाठी धोकादायक ठरु शकतात.
