AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणवर इस्त्रायलचा ‘पॉइंट टू पॉइंट अटॅक’,….मोसादच्या या रणनीतीने पुन्हा जग अचंबित

Israel Strike on Iran: मोसाद इस्त्रायलची गुप्तचर संस्था आहे. जगभरात सर्वात धोकादायक आणि सर्वश्रेष्ठ संस्था आहे. आंतराराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ही संस्था आहे. ही संस्था इतकी धोकादायक आहे की तिच्या नावानेच शूत्रला धडकी भरते.

इराणवर इस्त्रायलचा 'पॉइंट टू पॉइंट अटॅक',....मोसादच्या या रणनीतीने पुन्हा जग अचंबित
| Updated on: Jun 13, 2025 | 1:53 PM
Share

Israel Strike on Iran: इस्त्रायलने शुक्रवारी इराणवर भीषण हल्ला केला. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून तणाव होता. इराण अणूबॉम्ब बनवत असल्याची गुप्त माहिती इस्त्रायल मिळाली होती. त्यामुळे इस्त्रायलला इराणपासून मोठा धोका वाटू लागला होता. शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर केलेला हा हल्ला इतका अचूक होता की, इराणमधील अण्वस्त्र केंद्र नष्ट झाले. अणू उर्जा शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ सैन्य अधिकारी ठार झाले. इस्त्रायलने हे स्पष्ट केले की मोसादकडून मिळालेल्या माहितीनंतरच हा हल्ला करण्यात आला. इस्त्रायलविरोधी हालचाली असलेले ठिकाणी आणि अण्वस्त्र केंद्रावरच हल्ला करण्यात आला.

मोसाद इस्त्रायलची गुप्तचर संस्था आहे. जगभरात सर्वात धोकादायक आणि सर्वश्रेष्ठ संस्था आहे. आंतराराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ही संस्था आहे. ही संस्था इतकी धोकादायक आहे की तिच्या नावानेच शूत्रला धडकी भरते. मोसादचे एजंटांनी अनेक मोठ-मोठी कामगिरी पार पाडली आहे.

मोसादने पुन्हा केले सिद्ध

ऑपरेशन रायजिंग लॉयन अंतर्गत मोसादने पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. इराणच्या नतांज या अण्वस्त्र केंद्रावर त्यामुळेच इस्त्रायलला हल्ला करता आला. इराणचा अणू कार्यक्रम खूप वेगाने पुढे जात असल्याची माहिती मोसादला मिळाली होती. हजारो किलोग्रॅम संवर्धित युरोनियम आणि एटॉमिक फिजनचे पुरावे मोसादने मिळवले होते. त्यामुळेच आयडीएफने म्हटले होते की, इराणकडे इतका युरोनियम आहे की ते १५ अणूबॉम्ब बनवू शकतात.

मोसादने आपले काम चोख बजावले. इराणचे गुप्त अण्वस्त्र केंद्र आणि सैन्य ठिकाणांची माहिती इस्त्रयलच्या लष्करापर्यंत पोहचवली. यरुशलम टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले की, इस्त्रायचे लष्करी दल आयडीएफने म्हटले की, आमच्यापुढे ऑपरेशन “रायजिंग लायन” सुरु करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण इराण अशा पातळीवर पोहचत होतो की त्या ठिकाणावरुन परत येणे अशक्य होते.

मोसादने इस्त्रायल सैन्याला इराणची अण्वस्त्र केंद्र, वरिष्ठ सैन्य अधिकारी यांची माहिती दिली. त्यानंतर रायजिंग लायन ऑपरेशन अंतर्गत आयडीएफने अचूक हल्ला केला. या हल्ल्यात फक्त टारगेटचे नुकसान झाले. इस्त्रायलने स्पष्ट केले की, इराणचे कमांडर, अण्वस्त्र केंद्र यांनाच लक्ष्य करण्यात आले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.