Israel Iran Tension : इस्रायल खरच शांत आहे की हादरवणार? पडद्यामागे कसली तयारी चाललीय?

Israel Iran Tension : काही दिवसांपूर्वी इराण-इस्रायल संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला होता. इराणकडून पहिल्यांदाच थेट इस्रायलवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर इस्रायलने सुद्धा प्रत्युत्तर दिलं. पण त्यानंतर अचानक हा संघर्ष शांत झाला. आता एक नवीन माहिती समोर आलीय.

Israel Iran Tension : इस्रायल खरच शांत आहे की हादरवणार? पडद्यामागे कसली तयारी चाललीय?
Iran vs Israel
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 1:25 PM

मागच्या आठवड्यापर्यंत इराण आणि इस्रायलमध्ये मोठा तणाव होता. इस्रायलयने सीरियामधील इराणी दूतावासावर एअर स्ट्राइक केला. त्यानंतर इराणने 13 एप्रिलला इस्रायलवर पलटवार केला. त्यांनी शेकडो मिसाइल्स आणि ड्रोन्स इस्रायलच्या दिशेने डागले. त्यानंतर पाश्चिमात्य मीडियाने दावा केला होता की, ‘इस्रायलने इराणच्या इस्फहान शहरावर 19 एप्रिलला हल्ला केला. त्यानंतर अचानक या संघर्षाची चर्चा शांत झाली. आता जी माहिती समोर आलीय, त्यानुसार इस्रायल शांत बसलेला नाहीय. 13 एप्रिलच्या हल्ल्यानंतर इस्रायल आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमला अजून मजबूत करतोय.

इराणला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची तयारी सुरु आहे. माहितीनुसार, इस्रायलने आपल्या फायटर जेट F-16 मध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे F-16 ची इंधन क्षमता 50 टक्क्याने वाढली आहे. हे फायटर जेट आता अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम बनवण्यात आलं आहे. इस्फहान हे इराणसाठी रणनितीक दृष्टीने खूप महत्त्वाच शहर आहे. इराणची सैन्य शक्ती या ठिकाणी आहे. 19 एप्रिलला इस्रायलने याच शहरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कुठलही नुकसान झाल्याचा दावा इराणने फेटाळून लावला होता. ताज्या माहितीनुसार, इस्रायल इराणवर विनाशकारी हल्ला करण्याचा विचार करत आहे. इस्रायल आपल्या रक्षा प्रणालीला त्या हिशोबाने मजबूत करतोय. इराणच जास्तीत जास्त नुकसान करण्याचा उद्देश आहे.

इस्रायलने काय महत्त्वाचा बदल केलाय?

इस्रायलने आपल्या F-16 मध्ये अपग्रेडेशन करुन त्याची इंधन क्षमता दुप्पट केली आहे. अण्वस्त्र लांब पल्ल्यापर्यंत वाहून नेण्यासाठी सक्षम बनवलं आहे. इस्रायल ते इराण हे अंतर 2 हजार किलोमीटर आहे. एवढ्या लांब हल्ला करण्यासाठी इस्रायलला मिसाइल आणि फायटर जेटची आवश्यकता भासेल. इस्रायलने आपलं नवीन प्लेन + अण्वस्त्राला तुफान (Storm) नाव दिलय. F-16 प्लेन अणूबॉम्ब घेऊन इस्रायल ते इराणपर्यंत उड्डाण करण्यास आता सक्षम आहे.

Non Stop LIVE Update
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....