AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नर्स निमिषा प्रियाची फाशी रद्द?, घडामोडींना वेग, यमन सरकारने…

नर्स निमिषा प्रिया हिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर ती स्थगित करण्यात आली आणि आता मिळालेल्या माहितीनुसार, आता ती रद्द करण्यात आली. यापूर्वी यमनच्या हुती सरकारने निमिषाची फाशीची शिक्षा स्थगित केली होती.

नर्स निमिषा प्रियाची फाशी रद्द?, घडामोडींना वेग, यमन सरकारने...
| Updated on: Jul 29, 2025 | 8:14 AM
Share

केरळमधील नर्स यमनमध्ये संकटात सापडली. निमिषा प्रिया हिला यमनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तिला वाचवण्यासाठी भारताकडून प्रत्येक प्रयत्न केली गेली. केरळच्या पलक्कड जिल्ह्याची रहिवासी असलेली निमिषा 38 वर्षांची आहे. निमिषा 2008 साली यमनमध्ये गेली होती, ती नोकरीच्या शोधात तिथे गेली असता मोठ्या अडचणीत सापडली. निमिषा प्रिया फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आता नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. ग्रँड मुफ्ती कार्यालयाने याची पुष्टी केली आहे. हा निर्णय भारतासाठी मोठ्या विजयापेक्षा कमी नाही. मात्र, यावर अजूनही यमन सरकारला अजूनही काही भाष्य केले नाहीये.

सुरूवातीला निमिषा प्रिया हिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर ती स्थगित करण्यात आली आणि आता मिळालेल्या माहितीनुसार, आता ती रद्द करण्यात आली. यापूर्वी यमनच्या हुती सरकारने निमिषाची फाशीची शिक्षा स्थगित केली होती. सना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आधीच तात्पुरती स्थगित केलेली फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा भारतासाठी विजय आहे. 

निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु ती पुढे ढकलण्यात आली. भारत सरकारने निमिषाची फाशीची शिक्षा रद्द होण्यासाठी अनेक प्रयत्न केली होती. काही वर्षांपूर्वी निमिषाने तलाल महदीला एक इंजेक्शन दिले होते. ज्यामुळे त्याचा थेट जीव गेला. तलाल महदी हा निमिषाचा बिझनेस पार्टनर होता. निमिषाने त्याला इंजेक्शनमध्ये केटामाइन नावाचे औषध दिले होते.

निमिषाचा तलाल महदीला मारण्याचा कोणत्याही प्रकारचा उद्देश नव्हता. निमिषा ही वारंवार एकच सांगत आहे की, माझा त्याला मारण्याचा कोणताही उद्देश अजिबातच नव्हता, मला फक्त त्याला बेशुद्ध करायचे होते. तलाल महदी आणि निमिषा यांच्यातील वाद वाढला होता. निमिषा ही आपली पत्नी असल्याचे तो सर्वत्र सांगायचा आणि तिचा छळ करत होता. हेच नाही तर निमिषाने भारतात जाऊ नये, म्हणून त्याने तिचा पासपोर्ट देखील जप्त केला होता आणि निमिषाला तोच हवा होता.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.