AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Masood Azhar : पाकिस्तानातून मोठी बातमी, भारताचा कट्टर दुश्मन जैशचा प्रमुख मसूद अजहरच्या मोठ्या भावाचा रहस्यमयी खात्मा

Maulana Masood Azhar : 'मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अनवरचा अल्लाहच्या मर्जीने इंतकाल झाला' असा मेसेज पाठवला जात आहे. मागच्यावर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची निदर्यतेने हत्या केली होती.

Masood Azhar : पाकिस्तानातून मोठी बातमी, भारताचा कट्टर दुश्मन जैशचा प्रमुख मसूद अजहरच्या मोठ्या भावाचा रहस्यमयी खात्मा
Maulana Masood AzharImage Credit source: ANI
| Updated on: Mar 31, 2026 | 1:16 PM
Share

भारतात सध्या ‘धुरंधर द रिवेंज’ सिनेमा जोरात सुरु आहे. तिकीट खिडकीवर धुरंधर 2 चित्रपटाने कमाल केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 1000 कोटीपेक्षा जास्तची कमाई केली आहे. यात भारतीय हेर, पाकिस्तानातील गँगवॉर, दहशतवादी नेटवर्क दाखवलं आहे. हेर रणवीर सिंह पाकिस्तानात पाळमुळं रोवल्यानंतर वेचून, वेचून भारताच्या शत्रुंचा कसा खात्मा करतो? ते दाखवलं आहे. यात मधल्याकाळात पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांच्या रहस्यमयी हत्या कशा झाल्या? ते दाखवलं आहे. आता खऱ्यात आयुष्यातही अशीच एक भारताला सुखावणारी घटना घडली आहे. पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या भावाचा मृत्यू झाला आहे.

मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अनवर संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणाच्या सूत्रांनी अनवरच्या मृत्यूची पृष्टी केली आहे. मोहम्मद ताहिर अनवरचा मृत्यू कशामुळे झाला? त्याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मसूद अजहरचा भाऊ मोहम्मद ताहिर अनवरची जैशमध्ये महत्वाची भूमिका होती. तो जैशच्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. या बातमीनंतर गुप्तचर यंत्रणा अलर्टवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहिर अनवरचा पाकिस्तानातील बहावलपुर येथील जैशच्या मुख्यालयात दफनविधी होणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर 25 ऑक्टोंबर 2025 रोजी जैशची महिला विंग ‘जमात-उन-मोमिनत’ सुरु झाली.

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांकडून मेसेज

पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सुद्धा अनवरच्या मृत्यूचे मेसेज व्हायरल झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांकडून मेसेज पाठवला जात आहे. ‘मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अनवरचा अल्लाहच्या मर्जीने इंतकाल झाला’ असा मेसेज पाठवला जात आहे. मागच्यावर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची निदर्यतेने हत्या केली होती. त्यानंतर 5-6 मे च्या रात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं.

मसूदच्या कुटुंबातीला किती जणांचा खात्मा?

त्यामध्ये भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. या ऑपरेशनमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. भारताने या ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर सुद्धा हल्ला केला होता. यात मसूद अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 पैकी 4 सदस्य मारले गेले. जैशने स्टेटमेंट जारी करुन म्हटलेलं की, मसूद अजहरची मोठी बहिण, त्याचे भावोजी, भाच्याची पत्नी, भाची यांचा मृत्यू झाला होता.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?