AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोइंगच विमान अचानक 26 हजार फुटाने खाली आलं, प्रवाशांना भरली धडकी

या बोइंग विमानात 191 प्रवासी होते. चालक दलाची सदस्य संख्या जोडून एकूण 200 च्या आसपास लोक विमानात होते. प्रवाशांसाठी हा अनुभव धडकी भरवणारा होता.

बोइंगच विमान अचानक 26 हजार फुटाने खाली आलं, प्रवाशांना भरली धडकी
japan airlines boeing
| Updated on: Jul 02, 2025 | 1:31 PM
Share

जपानमध्ये बोइंग 737 या विमानाचा अपघात थोडक्यात टळला. बोइंगच्या या विमानाने चीनवरुन उड्डाण केलं. जपानची राजधानी टोक्यो येथे हे विमान चाललं होतं. शंघाय येथून उड्डाण केल्यानंतर विमानात अचानक बिघाड झाला. विमान वेगाने खाली येऊ लागलं. जवळपास 26 हजार फुटावरुन विमान अचानक खाली आलं. प्रवाशांसाठी हा अनुभव धडकी भरवणारा होता. प्रवाशांनी लगेच निरोपाचा संदेश लिहायला सुरुवात केली. सुदैवाने विमानाचं जमिनीवर सेफ लँडिंग झालं.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार या बोइंग विमानात 191 प्रवासी होते. चालक दलाची सदस्य संख्या जोडून एकूण 200 च्या आसपास लोक विमानात होते. बहुतांश प्रवासी चीनचे होते. ते जपानमधील टोक्यो येथे चाललेले. जपान सरकारनुसार केबिनमध्ये काही टेक्निकल फॉल्टची समस्या आली. पायलट ती समस्या दूर करत असताना विमान 10 मिनिटात 26 हजार फुटावरुन खाली आणण्यात आलं. विमानाच्या केबिनमध्ये हवेचा दबाव ठेवणाऱ्या प्रेशरायजेशन सिस्टमच्या फॉल्टबद्दल अलर्ट जारी करण्यात आला. पायलटने त्या बद्दल एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क साधला.

‘जीवन, मृत्यूचा सामना करता, तेव्हा सगळं तुच्छा वाटतं’

फ्लाइट खाली येताच एअर हॉस्टेसने वॉर्निंग जारी केली. वॉर्निंग ऐकताच फ्लाइटमध्ये एकच गडबड, गोंधळ सुरु झाला. लोकांनी आरडा, ओरडा सुरु केला. काही लोकांनी लगेच सोशल मीडियावर पोस्ट सुरु केल्या. एका प्रवाशाने विमान खाली येताना पाहून लिहिलं की, “माझं शरीर इथेच आहे. माझे पाय थरथरतायत. जेव्हा तुम्ही जीवन, मृत्यूचा सामना करता, तेव्हा सगळं तुच्छा वाटतं” लँडिंग केल्यानंतर विमान तासभर तिथेच होतं. लोकांना त्यानंतर बाहेर काढण्यात आलं. जपान एअरलाइन्सने प्रवाशांना नुकसानभरपाईपोटी 10 हजार रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. एअरलाइन्स कंपनीने या बद्दल खेद व्यक्त केला.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.