जपानी अब्जाधीश युसाकू मेजवा करणार चंद्राची सफर, अन्य आठ जणांना करवणार विनामूल्य सैर

जपानी अब्जाधीश युसाकू मेजवा करणार चंद्राची सफर, अन्य आठ जणांना करवणार विनामूल्य सैर(Japanese billionaire Yusaku mejava to travel to the moon, eight others to travel for free)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:58 AM, 4 Mar 2021
जपानी अब्जाधीश युसाकू मेजवा करणार चंद्राची सफर, अन्य आठ जणांना करवणार विनामूल्य सैर
जपानी अब्जाधीश युसाकू मेजवा करणार चंद्राची सफर

नवी दिल्ली : बर्‍याच लोकांना चंद्रावर जाण्याची इच्छा असते. जपानचे अब्जाधीश युसाकू मेजवा यांचे हे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मेजावा यांनी आठ जणांना चंद्राजवळ फिरण्यासाठी आमंत्रण दिले आहे. युसाकू एलन मॅक्सच्या स्पेसएक्स विमानातून मेजवा प्रवास करणार आहेत. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करीत युसाकू म्हणाले की, कोणतीही पार्श्वभूमी असेलेल्या लोकांनी माझ्याबरोबर या सफरमध्ये सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे. यासह युसाकूने एक अर्ज देखील शेअर केला आहे. (Japanese billionaire Yusaku mejava to travel to the moon, eight others to travel for free)

खर्च कोण उचलेल?

युसाकू म्हटले आहे की, या प्रवासाचा संपूर्ण खर्च ते स्वत: करणार असून ज्यांना ही सफर करण्याची इच्छा आहे ते या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर विनामूल्य अवकाशात जातील. या अभियानास ‘डियर मून’ असे नाव दिले जाईल आणि हे अभियान 2023 मध्ये अंमलात आणले जाईल. अर्ज भरण्यासाठी इच्छुक व्यक्तीला दोन निकष पूर्ण केले पाहिजेत.

काय आहेत निकष?

इच्छुक लोकांनी कोणत्याही माध्यमातून गरजूंना, समाजाला अधिकाधिक मदत करण्यासाठी सामाजिक कार्यात सहभाग घेतला पाहिजे. तसेच अशा आकांक्षा बाळगणाऱ्या इतरांना पाठिंबा देण्यास तयार असावे.

काय म्हणाले युसाकू?

युसाकू पुढे म्हणाले की, मी सर्व तिकिटे खरेदी केली आहेत, त्यामुळे एक प्रकारे हा वैयक्तिक प्रवास असेल. यापूर्वी मेजवा कलाकारांना सोबत नेणार असल्याचे बोलले होते. मात्र आता त्यांनी सर्व स्तरातील लोकांना आमंत्रित केले आहे. युसाकू पुढे म्हणाले की, जर तुम्ही स्वत: ला कलाकार म्हणून पाहिले तर तुम्ही कलाकार आहात.

गेल्या वर्षीही केली होती डॉक्युमेंटरी

गेल्या वर्षी युसाकू यांनी एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये ते त्यांच्यासाठी एका नवीन प्रेयसीचा शोध घेत होते, जी त्यांच्याबरोबर या ट्रिपवर जाईल. मेजावा याआधी अभिनेत्री अयमे गोरिकी हिच्यासोबत रिलेशनमध्ये होते. मात्र काही कारणामुळे त्याच्यात दुरावा आला आणि ते दोघे वेगळे झाले. सन 2018 मध्ये, मेजवा यांना चंद्रावर सैर करणारे पहिले खासगी प्रवासी म्हणून स्पेक्सएक्सने घोषित केले होते. (Japanese billionaire Yusaku mejava to travel to the moon, eight others to travel for free)

 

इतर बातम्या

Jasprit Bumrah Marriage | जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार, अभिनेत्री की कॉमेंटेटर, दोन नावं चर्चेत

RTE अंतर्गत प्रवेश नोंदणी सुरु, 96 हजार विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण