आधी राष्ट्रवादीशी जवळीकीची चर्चा, आता संजयकाकांनाच भाजपकडून ‘करेक्ट कार्यक्रमाची सुपारी’

सांगली महापौर निवडणुकीत जयंत पाटील यांनी केलेल्या करेक्ट कार्यक्रमाचा धसका घेत भाजपने सावध आणि आक्रमक पवित्रा घेतला. (Sangli MP Sanjaykaka Patil ZP Election)

आधी राष्ट्रवादीशी जवळीकीची चर्चा, आता संजयकाकांनाच भाजपकडून 'करेक्ट कार्यक्रमाची सुपारी'
भाजप खासदार संजयकाका पाटील
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 11:28 AM

सांगली : सांगली महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चा भाजपने चांगलीच धास्ती घेतल्याचं दिसत आहे. सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी भाजप खासदार संजयकाका पाटील यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संजयकाकांनी जयंत पाटलांची भेट घेतल्यामुळे त्यांची राष्ट्रवादीशी जवळीक निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. (Sangli BJP MP Sanjaykaka Patil appointed for ZP Election)

येत्या रविवारी सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी मिरजमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपमधील नाराज इच्छुकांशी चर्चा सुरु आहे. सांगली महापौर निवडणुकीत जयंत पाटील यांनी केलेल्या करेक्ट कार्यक्रमाचा धसका घेत भाजपने सावध आणि आक्रमक पवित्रा घेतला.

कोण आहेत संजय काका पाटील?

2014 साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर 2 लाख 38 हजार मतांनी निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाच सांगलीमध्ये काम करत होते. मात्र 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. दिवंगत आरआर आबांचे ते पक्षांअंतर्गत शत्रू मानले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

  • संजय काका पाटील सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
  • 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले आहेत
  • बेधडक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे
  • संजयकाका पाटील यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली.
  • काँग्रेसमधून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून ते विधानपरिषदेचे आमदार झाले
  • पुढे राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं.

(Sangli BJP MP Sanjaykaka Patil appointed for ZP Election)

जयंत पाटलांनी शेजारी बसवलं

सांगली जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा अभियान कार्यक्रमाच्या जयंत पाटील आणि संजयकाका पाटील हे दोघे एकत्र व्यासपीठावर आले होते. व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको म्हणत असताना जयंत पाटलांनी त्यांना शेजारी बसवलं आणि 15 मिनिटं चर्चा रंगली. यापूर्वीही एका बंद खोलीतून दोघे नेते एकत्र बाहेर आले होते.

“मी भाजपशी प्रामाणिक”

“राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचा विषय नाही, गट तट पक्ष हा मुद्दा थोडा बाजूला ठेवून जिल्ह्यातील चांगल्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो. मी भाजपशी प्रामाणिक आहे. मात्र कोणी जर मी भाजपमधून बाहेर जावं, असं म्हणत असतील, तर मी त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, असंही संजयकाका म्हणाले. वारंवार जयंत पाटील आणि संजयकाका पाटील हे एकत्र येत असल्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

संबंधित बातम्या :

“मी भाजपबाहेर जावं, असं कोणी म्हणत असेल, तर…” राष्ट्रवादीशी जवळीकीवर संजयकाकांनी मौन सोडलं

‘जुन्या मित्रांची यारी, राजकारणातली दुनियादारी’, भाजप खासदार संजयकाका पाटलांच्या मनात नेमकं काय?

(Sangli BJP MP Sanjaykaka Patil appointed for ZP Election)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.