“मी भाजपबाहेर जावं, असं कोणी म्हणत असेल, तर…” राष्ट्रवादीशी जवळीकीवर संजयकाकांनी मौन सोडलं

व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी बोलावून आग्रहाने जवळ बसवले (Sanjaykaka Patil NCP Jayant Patil)

मी भाजपबाहेर जावं, असं कोणी म्हणत असेल, तर... राष्ट्रवादीशी जवळीकीवर संजयकाकांनी मौन सोडलं
भाजप खासदार संजयकाका पाटील
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 1:07 PM

सांगली : राष्ट्रवादीशी जवळीक नाही, पण गट-तट, पक्ष हा मुद्दा बाजूला ठेवून चांगल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो, असं सूचक पण बचावात्मक वक्तव्य भाजप खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी केलं. मी भाजपातून बाहेर जावं, असं कोणी म्हणत असेल, तर त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, असंही संजयकाका म्हणाले. व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या संजयकाका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी बोलावून आग्रहाने जवळ बसवल्याने चर्चेला पुन्हा तोंड फुटलं. (BJP MP Sanjaykaka Patil reacts on closeness with NCP Jayant Patil)

सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली दौर्‍यात संजयकाका आवर्जून उपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

“मी भाजपशी प्रामाणिक”

“राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचा विषय नाही, गट तट पक्ष हा मुद्दा थोडा बाजूला ठेवून जिल्ह्यातील चांगल्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो. मी भाजपशी प्रामाणिक आहे. मात्र कोणी जर मी भाजपमधून बाहेर जावं, असं म्हणत असतील, तर मी त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, असंही संजयकाका म्हणाले. वारंवार जयंत पाटील आणि संजयकाका पाटील हे एकत्र येत असल्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

भाजपच्या बैठकांना अनुपस्थिती

भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका हे अनुपस्थित राहिले. सांगलीत काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली झाली, त्यावेळीही संजयकाका गैरहजर होते. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका आवर्जून उपस्थित राहिले.

जयंत पाटलांनी शेजारी बसवलं

सांगली जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा अभियान कार्यक्रमाच्या वेळी दोघे एकत्र व्यासपीठावर आले होते. व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको म्हणत असताना जयंत पाटलांनी त्यांना शेजारी बसवलं आणि 15 मिनिटं चर्चा रंगली. यापूर्वीही एका बंद खोलीतून दोघे नेते एकत्र बाहेर आले होते.

कोण आहेत संजय काका पाटील?

2014 साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर 2 लाख 38 हजार मतांनी निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाच सांगलीमध्ये काम करत होते. मात्र 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला होता. दिवंगत आर आर आबांचे ते पक्षांअंतर्गत शत्रू मानले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. (BJP MP Sanjaykaka Patil reacts on closeness with NCP Jayant Patil)

  • संजय काका पाटील सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
  • 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले आहेत
  • बेधडक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे
  • संजयकाका पाटील यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली.
  • काँग्रेसमधून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून ते विधानपरिषदेचे आमदार झाले
  • पुढे राष्ट्रवादीला राम राम ठोकून त्यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं.

VIDEO 

संबंधित बातम्या :

संजयकाका म्हणाले, नको नको नको, जयंत पाटलांनी आग्रहाने शेजारी बसवलं

‘जुन्या मित्रांची यारी, राजकारणातली दुनियादारी’, भाजप खासदार संजयकाका पाटलांच्या मनात नेमकं काय?

(BJP MP Sanjaykaka Patil reacts on closeness with NCP Jayant Patil)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.