‘जुन्या मित्रांची यारी, राजकारणातली दुनियादारी’, भाजप खासदार संजयकाका पाटलांच्या मनात नेमकं काय?

सांगलीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार संजयकाका पाटील एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते (Jayant Patil Sanjaykaka Patil)

'जुन्या मित्रांची यारी, राजकारणातली दुनियादारी', भाजप खासदार संजयकाका पाटलांच्या मनात नेमकं काय?
जयंत पाटील आणि संजयकाका पाटील


सांगली : सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील (BJP MP Sanjaykaka Patil) भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका हे अनुपस्थित राहिले. सांगलीत काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली झाली, त्यावेळीही संजयकाका गैरहजर होते. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री, सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका आवर्जून उपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आलं आहे. (Jayant Patil forces BJP MP Sanjaykaka patil to seat besides in Sangli)

सांगलीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार संजयकाका पाटील एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. लांब बसणाऱ्या संजयकाकांना स्टेजवर आवर्जून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या जवळ बोलावून बसवलं. या दोन नेत्यांची बराच वेळ चर्चा सुरु होती. यापूर्वीही एका बंद खोलीतून दोघे नेते एकत्र बाहेर आले होते.

सांगली जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा अभियान कार्यक्रमाच्या वेळी दोघे एकत्र व्यासपीठावर आले होते. व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको म्हणत असताना जयंत पाटलांनी त्यांना शेजारी बसवलं आणि 15 मिनिटं चर्चा रंगली.

कोण आहेत संजय काका पाटील?

2014 साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर 2 लाख 38 हजार मतांनी निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाच सांगलीमध्ये काम करत होते. मात्र 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला होता. दिवंगत आर आर आबांचे ते पक्षांअंतर्गत शत्रू मानले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. (Jayant Patil forces BJP MP Sanjaykaka patil to seat besides in Sangli)

  • संजय काका पाटील सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
  • 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले आहेत
  • बेधडक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे
  • संजयकाका पाटील यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली.
  • काँग्रेसमधून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून ते विधानपरिषदेचे आमदार झाले
  • पुढे राष्ट्रवादीला राम राम ठोकून त्यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं.

VIDEO 

संबंधित बातम्या :

संजयकाका म्हणाले, नको नको नको, जयंत पाटलांनी आग्रहाने शेजारी बसवलं

(Jayant Patil forces BJP MP Sanjaykaka patil to seat besides in Sangli)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI