Joe Biden Son Hunter Biden वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचा मुलगा हंटर बायडन कायमच वादात सापडतो. यावेळी तो एका मोठ्या वादात सापडला असून त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. हंटर बायडनने रशियाच्या एका कॉलगर्लला वडिलांच्या खात्यावरुन 25 हजार डॉलर (जवळपास 18 लाख 55 हजार रुपये) पाठवलेत. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिलंय. याप्रमाणे, हंटरने मे 2018 मध्ये एका 24 वर्षीय महिलेसोबत काही दिवस घालवले. या बदल्यात या कॉलगर्लला पेमेंट करताना त्यांनी जो बायडन यांच्या खात्याचा वापर केला. ही घटना घडली तेव्हा हंटर लॉस एंजिल्समद्ये Chateau Marmont नावाचा व्यक्ती म्हणून हॉटेलमध्ये थांबले होते (Joe Biden son Hunter Biden pay Russian call girl through fathers account).