नायजेरियात 279 शाळकरी मुलींचं अपहरण, बंदुकधाऱ्यांच्या छळ छावणीतून 4 दिवसांनी सुटका

नायजेरियात (Nigeria) मागील आठवड्यात अपहरण करण्यात आलेल्या शेकडो शाळकरी मुलींची (School Girls) अखेर सुटका झाली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:24 PM, 2 Mar 2021
नायजेरियात 279 शाळकरी मुलींचं अपहरण, बंदुकधाऱ्यांच्या छळ छावणीतून 4 दिवसांनी सुटका

आबुजा (नायजेरिया) : नायजेरियात (Nigeria) मागील आठवड्यात अपहरण करण्यात आलेल्या शेकडो शाळकरी मुलींची (School Girls) अखेर सुटका झाली आहे. या मुलींचं नायजेरियातील उत्तर पश्चिम जामफारा राज्यातील (Zamfara State) एका निवासी शाळेतून शुक्रवारी (26 फेब्रुवारी) अपहरण करण्यात आलं होतं. जामफारा राज्याचे गव्हर्नर बेलो मातावाले (Bello Matawalle) यांनी आता या 279 मुलींची सुटका झाल्याची माहिती दिली (Kidnapping of School girls in Nigeria by gunmen).

गव्हर्नर मातावाले म्हणाले, “मला हे सांगताना खूप आनंद होतोय की जांगीबी शाळेतील अपहरण झालेल्या सर्व मुलींची अपहरणकर्त्यांनी सुटका केली आहे. आता आपल्या मुली सुरक्षित असल्याने आपल्याला आनंद व्हायला हवा. काही बंदुकधाऱ्यांनी जांगीबी भागातील सरकारी मुलींच्या कनिष्ठ माध्यमिक शाळेतून मुलींचं अपहरण केलं होतं. असोसिएटेड प्रेसच्या पत्रकाराने पाहिलं की राज्य सरकारच्या एका कार्यालयात फिक्या निळ्या रंगाचे हिजाब घातलेल्या शेकडो मुली बसलेल्या आहेत.

एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार अपहरण करणाऱ्यांनी रस्त्यातील मिलिट्री कॅम्प आणि चेक पॉईंटलाही लक्ष्य केलं. पोलीस किंवा सैनिक मुलींच्या मदतीला येऊ नये म्हणून हे हल्ले करण्यात आले. या अपहरणानंतर पोलीस आणि सैनिकांनी संयुक्त मोहिम राबवत मुलींना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. या अपहरणानंतर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

नायजेरियात मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ

मागील काही वर्षांमध्ये नायजेरियातील अपहरणाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीय. 2014 मध्ये 276 मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यापैकी 100 मुली अद्यापही बेपत्ता आहेत. दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी 24 विद्यार्थीनी, 6 कर्मचारी आणि 8 नातेवाईकांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांची शनिवारी सुटका करण्यात आली. या लोकांना नायजेरियाच्या राज्य सरकारच्या सायन्स कॉलेजमधून (कगारा) अपहरण करण्यात आलं होतं.

डिसेंबरमध्ये कांकरा भागातील एका माध्यमिक शाळेतून 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. सर्वात कुख्यात अपहरण एप्रिल 2014 मध्ये करण्यात आलं होतं. बोर्नो राज्यातील चिबोकमधील माध्यमिक शाळेतून बोको हरमच्या दहशतवाद्यांनी 276 मुलींचं अपहरण केलं होतं. यातील 100 मुली अजूनही बेपत्ता आहेत. बोको हरमचा पाश्चिमात्य शिक्षणाला विरोध असल्याने अशा घटना घडत असल्याचं सांगितलं जातंय.

हेही वाचा :

वसईत महिलेला झाडाला बांधून मारहाण, आक्षेपार्ह व्हिडीओही बनवल्याने खळबळ

सरपंचपदाच्या उमेदवाराला गाडीत बसवून लॉजवर नेले, धुळ्यात सिनेस्टाईल अपहरण

अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार नंतर हत्या; आरोपीच्या घराजवळ आढळला मृतदेह

व्हिडीओ पाहा :

Kidnapping of School girls in Nigeria by gunmen