ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये झालेला Brexit करार काय आहे? याचा भारतावर काय परिणाम होणार?

मागील मोठ्या काळापासून प्रलंबित ब्रेक्झिट करार अखेर पूर्ण झालाय. यानुसार आता ब्रिटन म्हणजेच इग्लंड (Britain) युरोपियन युनियन (EU) मधून बाहेर पडला आहे.

ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये झालेला Brexit करार काय आहे? याचा भारतावर काय परिणाम होणार?

लंडन : मागील मोठ्या काळापासून प्रलंबित ब्रेक्झिट करार अखेर पूर्ण झालाय. यानुसार आता ब्रिटन म्हणजेच इग्लंड (Britain) युरोपियन युनियन (EU) मधून बाहेर पडला आहे. यासाठी ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापारविषयक करारही (Brexit Trade Deal) झाले आहेत. मागील काही वर्षांपासून ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरु झाली होती, मात्र त्यावर एकमत झालं नव्हत. मात्र, आता अखेर दोन्हीकडील पक्षांनी याला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे यापुढे ब्रिटन युरोपच्या सामाईक बाजाराचा भाग नसेल. या करारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येतेये (Know all about UK EU Brexit trade deal effect on India).

यानंतर आता ब्रिटन (Britain) युरोपच्या सामूहिक बाजाराचा भाग राहणार नाही. त्यामुळे युरोपियन युनियनमधील सर्व देशांना असणारी एकच कररचना आणि व्यापारविषयक नियम ब्रिटनला लागू होणार नाही. ब्रेग्झिटनंतर अखेर या कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरुप मिळतंय. या कराराला अंतिम रुप देण्यासाठी मागील 10 महिन्यांपासून त्यावर चर्चा सुरु होती. त्यानंतर दोन्ही बाजूने हा करार मान्य करण्यात आला. दुसरीकडे युरोपीयन आयोगाचे (European commission) प्रवक्त्यांनी देखील लवकरच या कराराची माहिती देणार असल्याचं म्हटलं.

ब्रेक्झिट करार काय आहे?

ब्रेक्झिट ब्रिटन आणि एक्झिट या दोन शब्दांपासून बनला आहे. या सरळ अर्थ आहे ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. ब्रिटनने जवळपास वर्षभरापूर्वीच युरोपीयन युनियनमधून बाहेर पडच असल्याची घोषणा केली होती. हा निर्णय म्हणजे मागील 5 वर्षांच्या प्रयत्नांचं फळ आहे. 2016 मध्येच ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याबाबत जनमत घेण्यात आलं होतं.

ब्रेक्झिटचा भारतावर काय परिणाम होणार?

या कराराचा भारतावरही परिणाम होणार आहे. भारतचा आता स्वतंत्रपणे ब्रिटनशीच व्यापारिक करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापार वाढण्यास मदतह होईल.

सायबर सुरक्षा, डिफेन्स आणि फायनान्समध्ये मोठ्या भागिदारीला भारत तयार

ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याने आता याचा भारताला फायदा होऊ शकतो. भारत ब्रिटनला उत्पादन आणि सेवेची ऑफर देऊ शकतो. भारत सायबर सुरक्षा, टेक्नोलॉजी, डिफेन्स आणि आर्थिग क्षेत्रात ब्रिटन आणि भारताची भागीदारी होऊ शकते.

संबंधित बातम्या :

ब्रेक्झिट : संसदेत पंतप्रधान थेरेसा मे यांचा दारुण पराभव

Know all about UK EU Brexit trade deal effect on India

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI