दुबई : भारतात सरकारी लसीकरण केंद्रांवर कोरोनाची लस मोफत दिली जात आहे. मात्र, तरीही भारतातील श्रीमंत लोक कोरोना लस (Corona vaccine) घेण्यासाठी दुबईला जात आहेत. यासाठी ते 35 ते 55 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करुन चार्डर्ड प्लेनने दुबईचा प्रवास करतात. भारतात मोफत कोरोना लस असतानाही हे लोक दुबईला का जात आहेत असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार आहे. याच उत्तराचा शोध घेण्याच्या निमित्ताने या श्रीमंत भारतीयांच्या या दुबईचा प्रवास करुन वेगळी कोरोना लस घेण्याचा हा खास आढावा (Know all about why Indians going to Dubai amid free vaccination in India Pfizer Vaccine).