रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीच्या खर्चाबद्दल हैराण करणारी माहिती, तब्बल..

भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर विविध पद्धतीने दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. हेच नाही तर अमेरिकेमुळे रशिया आणि भारताचे संबंध एका वेगळ्या वळणावर आहेत. त्यामध्ये पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीच्या खर्चाबद्दल हैराण करणारी माहिती, तब्बल..
Russian President Vladimir Putin
Updated on: Dec 02, 2025 | 12:21 PM

रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या तणाव वाढताना दिसत आहे. युक्रेनने रशियाच्या तेल टॅंकरला टार्गेट करत मोठा हल्ला केला. रशियाकडूनही या हल्ल्याला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दाैऱ्यावर येत आहेत. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. दोन दिवसांच्या भारत दाैऱ्यावर पुतिन आहेत. युक्रेन युद्धादरम्यान मोदी आणि पुतिन यांची ही पहिलीच प्रत्यक्षात भेट असेल. धोरणात्मक दिशा या भेटीतून ठरू शकते. हेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या दबावानंतर भारत आणि रशियातून संबंध वेगळ्या स्तरावर पोहोचले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा हैराण करणारा निर्णय घेतला आहे.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा विदेश दाैरा असा तसा नसून एखाद्या मोठ्या ऑपरेशनसारखा असतो. जमिनीपासून ते आकाशापर्यंत प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवली जाते. पुतिन यांच्या विदेश दाैऱ्यावर कोट्यावधी रूपये खर्च केली जातात. ज्याचा खर्च दोन देश मिळून करतात. आता पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान भारत अर्धा खर्च करतो तर रशिया स्वत: अर्धा खर्च करते. ज्या हॉटेलमध्ये पुतिन यांची राहण्याची व्यवस्था केली जाते, त्या हॉटेलच्या त्या मजल्यावर इतर कोणालाही रूम दिली जात नाही.

पूर्ण मजला हा फक्त आणि फक्त पुतिन यांच्यासाठी बूक असतो. अतिशय गोपनीय पद्धतीने सर्व व्यवस्था केली जाते. प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जाते. जगातील सर्वात जास्त खर्चिक सुरक्षा आणि दाैरा पुतिन यांचाच आहे. पुतिन ज्या विमानाने भारतात येणार आहेत, ते सामान्य विमान नाहीये. ते एक युद्ध केंद्रित विमान आहे. Il-96 क्षेपणास्त्रविरोधी प्रणालींपासून ते सुरक्षित संप्रेषण बंकरपर्यंत सर्व गोष्टींनी सुसज्ज आहे.

या विमानाच्या उड्ढाणाचा खर्च कोट्यावधीच्या घरात आहे. विमानाचा पूर्ण खर्च रशिया करतो. त्याच्यासोबत येणारी एफएसओ सुरक्षा टीम, त्याचाही खर्च रशियाच्या बजेटमधून होतो. पुतिन उतरताच भारताकडून Z+ सुरक्षा दिली जाईल.  SPG, NSG, RAW, IB आणि दिल्ली पोलिस प्रत्येकी स्वतःचे सुरक्षा स्तर तैनात करतात. विविध प्रकारे पुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली जाते. त्याचा संपूर्ण खर्च भारत उचलतो. या व्यवस्थेचा खर्च भारत उचलतो, सुरक्षा व्यवस्थापनात 25 कोटीच्या आसपास भारताचा खर्च होईल. भारत सरकारच्या खर्चात जेवण, बैठकीचे सभागृह, पत्रकार परिषदा, सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होतो. ज्याचा खर्च 5 कोटी ते 15 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.