रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, रात्रभर बॉम्ब हल्ले, युक्रेनने थेट कैरोस आणि विराटवर..
रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, आता हे युद्ध थांबवण्यापेक्षा पेटताना दिसत आहे. काळ्या समुद्रात, युक्रेनने दोन मोठ्या रशियन तेल टँकरवर हल्ला केला.

युक्रेन आणि रशिया युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. एक उच्चस्तरीय युक्रेनियन पथक अमेरिकेत पोहोचले आहे. जिथे ते संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल. हे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका निर्बंध लादत आहे. त्यामध्येच आता रशियन तेल टँकरवर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली असून युद्ध थांबवण्याऐवजी अधिक भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकेत युक्रेनियन शिष्टमंडळाचे स्वागत करण्यासाठी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ उपस्थित होते. युक्रेनचे शिष्टमंडळ जरी युद्ध थांबवण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेत पोहोचले असले तरीही युक्रेनने रशियन तेल टँकरवर केलेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला.
काळ्या समुद्रात, युक्रेनने दोन मोठ्या रशियन तेल टँकर कैरोस आणि विराटवर सागरी ड्रोनने हल्ला केला. फुटेजमध्ये हे सी बेबी ड्रोन टँकरशी टक्कर करताना दिसत आहेत. हा अत्यंत मोठा हल्ला युक्रेनने रशियाच्या तेल टॅंकरवर केला आहे. मुळात म्हणजे ही ती टँकर आहेत जे रशिया निर्बंधांपासून वाचण्यासाठी परदेशात कच्चे तेल पाठवण्यासाठी वापरतो. युक्रेनचा दावा आहे की हे टँकर वापरून रशिया युद्धासाठी पैसे उभारण्यासाठी करतो.
तुर्कीने देखील याबाबतची पुष्टी केली की, कैरोसमध्ये मोठा स्फोट आणि आग लागली होती. या हल्ल्यानंतर रशियाने रात्रभर युक्रेनवर हल्ला करत थेट मोठे उत्तरच दिले. डनिप्रो, कीव आणि दक्षिणेकडील प्रदेशांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव केला. कीवमधील विजपुरवठा पुन्हा एकदा रशियाने पूर्णपणे बंद केला. रशियाने केलेल्या या हल्ल्यानंतर कीवमधील काही लोकांचा जीव गेल्याचीही माहिती मिळतंय.
युक्रेनने थेट रशियन तेल टँकरवर हा हल्ला केल्याने रशिया अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसतोय. युक्रेनकडून एकीकडे युद्ध थांबवण्यासाठी शिष्टमंडळ अमेरिकेत पाठवले जात आहे तर दुसरीकडे रशियाच्या तेल टॅंकरवर हल्ले केली जात आहेत. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये हे युद्ध अधिक भडकण्याची शक्यता आहे.
