AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Violence : ओली सरकारचं एक पाऊल मागे, तरी नेपाळमध्ये आज काहीतरी मोठं घडणार, कारण…

Nepal Violence :नेपाळ सरकारने सोमवारी रात्री उशिरा सोशल मीडियावरील बंदी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. के पी ओली सरकार बॅकफूटवर आलय. त्यांनी एक पाऊल मागे घेतलय. मात्र, तरीही आज नेपाळमध्ये काहीतरी मोठं घडणार आहे. तसे स्पष्ट संकेत आहेत. आतापर्यंत या आंदोलनात 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

Nepal Violence : ओली सरकारचं एक पाऊल मागे, तरी नेपाळमध्ये आज काहीतरी मोठं घडणार, कारण...
Nepal ViolenceImage Credit source: AP/PTI
| Updated on: Sep 09, 2025 | 1:17 PM
Share

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी विरोधात काल हिंसक आंदोलन झालं. यात 21 जणांचा मृत्यू झाला. संध्याकाळी नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाची इमर्जन्सी बैठक झाली. सरकारने सोमवारी रात्री उशिरा बंदी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. सरकारने युवकांना प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली. युवकांनी सांगितलय की, आज मंगळवारी प्रदर्शन अजून जोरात करणार. नेपाळी संसद भवनाबाहेर आज मंगळवारी हळूहळू गर्दी जमू लागली आहे. संसद भवनाबाहेर तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीच्या खुणा स्पष्टपणे दिसतायत. लोकांनी पंतप्रधान केपी ओली यांना हटवण्याची आणि पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ‘केपी चोर… देश छोड़’ अशा घोषणा नेपाळमध्ये दिल्या जात आहेत. आमचं आंदोलन फक्त सोशल मीडिया विरोधात नाहीय, तर नेपाळमधून भ्रष्टाचार सुद्धा हद्दपार झाला पाहिजे असं आंदोलकांनी सांगितलं.

एका आंदोलकाने सोमवारी रात्री सांगितलं की, “आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून प्रदर्शन करतोय.भ्रष्टाचाराने टोक गाठलं आहे. हेच विरोध प्रदर्शनाच मुख्य कारण आहे” ‘आम्ही इथे जखमी आंदोलकांना मदत करत आहोत. मंगळवारपासून विरोध प्रदर्शन अजून जोर पकडेल’ असं या आंदोलकाने सांगितलं. “आम्ही भ्रष्टाचाराविरोधात प्रदर्शन करत आहोत. नेत्यांच आयुष्य आणि आमचं जीवन यात भरपूर फरक आहे. हे चुकीच आहे. आमचा पैसा योग्य ठिकाणी जात नाही. देशाचे मोठे नेते आणि त्यांचे लोक भ्रष्ट आहेत. आमचा पंतप्रधान सर्वात खराब आहे. विद्यार्थी फक्त भ्रष्टाचार बंद करायला सांगत आहेत. पण त्यांना गोळ्या घातल्या जातायत. पोलिसांनी गुडघ्याच्या खाली गोळ्या मारल्या असत्या, तर ठीक होतं. पण त्यांनी लोकांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या मारल्या” असं एका आंदोलकाने सांगितल.

काठमांडूमध्ये एका आंदोलकाने सांगितलं की, मी बातम्यांमध्ये बघितलं की, “अनेक लोक जखमी आहेत. त्यांना गोळी लागलेली. म्हणून मी रक्तदान करण्यासाठी आलो. आमचा विरोध भ्रष्टाचाराला आहे. आम्ही त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आलो आहोत असं काठमांडूमध्ये एका आंदोलकाने सांगितलं”

Nepo Kid ट्रेंडही चालवला

युवकांच्या या आंदोलनात सोशल मीडिया बॅनशिवाय बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदी हे सुद्धा मुद्दे आहेत. युवकांना याच मुद्यावरुन सरकारला घेरायचं आहे. त्यांनी सोशल मीडियावर Nepo Kid ट्रेंडही चालवला. नेत्यांची मुल भ्रष्टाचाराच्या पैशाने ऐश करत असल्याचा आरोप केला. आम्ही बेरोजगार आहोत. भ्रष्टाचार संपवण्याचा ओली सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप या आंदोलकाने केला.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....