AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Spain Volcano Eruption: स्पेनच्या बेटावर ज्वालामुखीचा भयंकर स्फोट, बेटावरचं सगळं काही बेचिराख, लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन

Spain Volcano Eruption Video: ज्वालामुखी फुटल्यानंतर आता हादरवणारी दृश्यं समोर येऊ लागली आहेत. या दृश्यांमध्ये ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहायला मिळतं आहे. एका दृश्यामध्ये ज्वालामुखीमध्ये स्फोट होताना सहज दिसतं आहे

Spain Volcano Eruption: स्पेनच्या बेटावर ज्वालामुखीचा भयंकर स्फोट, बेटावरचं सगळं काही बेचिराख, लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन
स्पेनच्या ला पल्मा ज्वालामुखीच भंयकर स्फोट, सगळंकाही बेचिराख
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 20, 2021 | 6:17 PM
Share

Volcano Eruption in Spain: रविवारी स्पेनमध्ये एका ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ला पल्मा (La Palma) या अटलांटिक बेटावरील या ज्वालामुखीमध्ये स्फोट (Spain Volcano Eruption) होण्यास सुरु झाले आहेत. स्पेनचं सरकारी चॅनल टीव्हीईच्या दृष्यांमध्ये या ज्वालामुखीतून काळा आणि पांढरा धूर निघताना दिसत आहे. कॅनरी बेटावरील ज्वालामुखीतही स्फोट सुरु झाल्याची माहिती आहे.

स्पेन सरकारने ला पाल्मा या अटलांटिक बेटावरुन लोकांना रेस्क्यु करण्यास सुरुवात केली आहे. तर काही शास्रज्ञांच्या मते लवकरच इथं भूकंपाचे तीव्र झटके आणि मोठे ज्वालामुखी स्फोट होण्याची शक्यता आहे. याआधी भूकंप येणार नाही असं सांगण्यात आलं होतं, मात्र आता बदललेली परिस्थिती पाहता लोकांना या ठिकाणाहून हलवणं हाच पर्याय असल्याचं दिसतं आहे.

रविवारी 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप

रविवारी जेव्हा हा ज्वालामुखी फुटला तेव्हा 3.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. यावेळी संपूर्ण बेटावर झटके अनुभवायला मिळाले. ज्वालामुखीवर संशोधन करणाऱ्या शास्रज्ञांच्या मते, यापुढे अजून जास्त तीव्रतेचे झटके येऊ शकतात. ज्यामुळं बेटावर असलेल्या इमारतींना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हेच नाही तर या अटलांटिक बेटाच्या दक्षिण पश्चिम तटावरच्या डोंगराचा मोठा भागही कोसळू शकतो. याआधी 1971 मध्ये या ज्वालामुखीमध्ये स्फोट झाले होते.

ज्वालामुखी फुटल्यानंतरही हादरवणारी दृष्यं

ज्वालामुखी फुटल्यानंतर आता हादरवणारी दृश्यं समोर येऊ लागली आहेत. या दृश्यांमध्ये ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहायला मिळतं आहे. एका दृश्यामध्ये ज्वालामुखीमध्ये स्फोट होताना सहज दिसतं आहे. यातून लाव्हारसाचे धबधब्याप्रमाणे उडणारे तुषार सहज पाहायला मिळतात.

पाहा व्हिडीओ-

तर आणखी एका व्हिडीओमध्ये धगधगता लाव्हारस सगळीकडे पसरलेला दिसतो आहे. या लाव्हा रसाने सगळ्या गोष्टी आपल्या काखेत घेतल्या आहे, सगळीकडे आग लागल्याची ही भयानक दृश्य आहेत. सगळं आकाश लाल झालं आहे, आणि लाव्हा रसाची नदी वाहताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

तर अजून एका व्हिडीओत, हा लाव्हा रस थेट लोकांच्या घरापर्यंत पोहचलेला दिसत आहे. सगळे काही बेचिरख करत हा लाव्हा बंगल्याच्या कम्पाऊंटमध्ये शिरतो आहे, आणि तिथं असलेली झाडं जाळत आहे. ज्वालामुखीची ही भयाण दृश्य स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहेत. सध्या इथल्या सर्व स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.

पाहा व्हिडीओ-

1971 नंतर पहिल्यांदाच या ज्वालामुखीने इतकं भयानक रुप दाखवलं आहे. त्यामुळे स्थानिकांच्या चिंता वाढल्या आहेत. पृथ्वीच्या पोटातील हलचल अद्याप थांबलेली नाही, त्यामुळेच येत्या काही तासांत हा ज्वालामुखी अजून भयाण रुप दाखवू शकतो, भूकंपाचे तीव्र झटके या बेटाला बसू शकतात अशी शक्यता भूगर्भशास्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर