आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गायब, चीनमध्ये यापूर्वीही सरकारविरोधी बोलणारे हायप्रोफाईल्स बेपत्ता

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Jan 04, 2021 | 4:50 PM

एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरलेले अलिबाब उद्योग समुहाचे प्रमुख जॅक मा (Jack Ma) मागील 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत.

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गायब, चीनमध्ये यापूर्वीही सरकारविरोधी बोलणारे हायप्रोफाईल्स बेपत्ता

Follow us on

बीजिंग : एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरलेले अलिबाब उद्योग समुहाचे प्रमुख जॅक मा (Jack Ma) मागील 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत. यानंतर चीन सरकारविरोधी बोलणारे लोक बेपत्ता होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. जॅक यांनी चीनच्या सत्ताधारी पक्षावर टीका केली होती. त्यानंतर नोव्हेंबरपासून त्यांना कुणीही पाहिलेले नाही. त्यामुळे ते बेपत्ता असण्याचा संशय दाट होत आहे. असं असलं तरी चीन सरकारवर टीका केल्यानंतर अशाप्रकारे अचानक बेपत्ता होणारे जॅक पहिले नाहीत. याआधी देखील सरकारविरोधी बोलल्यानंतर चीनमध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे चीनमध्ये (China) सरकारविरोधात बोलणारे लोक बेपत्ता होत असल्याचा गंभीर आरोप होतोय. त्याचाच हा आढावा (List of Missing persons in China like Alibaba chief Jack Ma after anti Government statements).

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी 2013 मध्ये सत्ता काबिज केल्यानंतर काही कायदे केले आहेत. यात राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर अनेक दमनकारी कायदे करण्यात आले. यामुळे चीन सरकारला निरंकुश अधिकार देण्यात आले आहेत. यानंतरच लोकांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याचं बोललं जातंय.

1. फॅन बिंगबिंग

फॅन बिंगबिंग चीनमधील सर्वात कमाई करणारी अभिनेत्री आहे. तने एक्स-मन आणि आयरन मॅनसारख्या चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. मागील वर्षी जूनमध्ये फॅनवर कथित करचोरीचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. मात्र, नंतर मोठा काळ फॅन बिंगबिंग बेपत्ता झाली. त्यामुळे चिनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म ‘वीबो’वर तिच्या 63 मिलियन (6 कोटी 30 लाख) चाहत्यांना चांगलाच झटका बसला. जवळपास 100 दिवसांपेक्षा अधिक दिवस बिंगबिंग बेपत्ता होती.

2. कॅनडाचे नागरिक बेपत्ता

कॅनडाचे नागरिक असलेले आणि चिनी दूरसंचार कंपनी हुआवेईच्या मुख्य आर्थिक विभागाच्या अधिकारी मेंग वानझू यांना अटक करण्यात आली. त्यानंतर तात्काळ उद्योगपती मायकल स्पॉवर आणि माजी राजदूत (पराष्ट्र अधिकारी) मायकल कोवृग यांना डिसेंबरमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. आणखी तिसऱ्या कॅनडाचा नागरिक सारा मॅकिवरलाही दोन आठवड्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं होतं. सध्या कोवृग आणि स्पॉवर नजरकैदेत आहेत. मॅकिवरला मागील आठवड्यात सोडून देण्यात आले.

3. जीन एडिटिंग सायन्टिस्ट

चिनी वैज्ञानिक जियानकुई नोव्हेंबरमध्ये गायब झाले होते. आतापर्यंत त्यांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाहिलेलं नाही. द न्यूयॉर्क टाइम्सने डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचा एक फोटो प्रकाशित केला होता. यात त्यांनी जियानकुई सुरक्षित असून त्यांना नजरकैद केलं असल्याची माहिती दिली. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी 12 सुरक्षा कर्मचारी आहेत.

4. इंटरपोलचे माजी अध्यक्षही बेपत्ता

इंटरपोलचे माजी अध्यक्ष मेंग होंगवेई फ्रांसमध्ये आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. सप्टेंबरमध्ये ते आपल्या देशात परतले. मेंग चीनमध्ये सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री देखील राहिलेले आहेत. मात्र, ते 29 सप्टेंबरपासून बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीनेच ही माहिती दिली.

याशिवाय 10 लाख उइगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांक समूहाचे सदस्यांचा देखील बेपत्ता होणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा :

चीनचे अब्जाधीश जॅक माला 2 महिन्यात 80 हजार कोटींचं नुकसान, नेमकं काय झालं?

चीनच्या वुहानमधील कोरोना संसर्गाचं सत्य जगासमोर आणलं, महिला पत्रकाराला 4 वर्षांची शिक्षा

वुहानची हकिकत मांडण महागात, महिला पत्रकाराला चीनच्या कोर्टाकडून 4 वर्षे तुरुंगवास

List of Missing persons in China like Alibaba chief Jack Ma after anti Government statements

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI