AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीला महाराष्ट्र एटीएसचा दणका, तब्बल 9 ठिकाणी छापे, समर्थन देणाऱ्या..

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी भारतात पाय पसरवताना दिसत आहे. त्याने भारतात आपले नेटवर्क वाढवण्यास सुरूवात केली. यादरम्यानच काही दहशतवादी भरतींमध्ये त्याचे नाव पुढे आले. यादरम्यानच आता त्याला मोठा दणका देण्यात आला.

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीला महाराष्ट्र एटीएसचा दणका, तब्बल 9 ठिकाणी छापे, समर्थन देणाऱ्या..
Pakistani gangster Shahzad Bhatti
| Updated on: May 13, 2026 | 10:28 AM
Share

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. शहजाद भट्टी गँग आणि डोगर गँगशी संबंधित महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई केली. इंटरनेटच्या जगात हिरो बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारदतीय तरुणांना याची कल्पनाही नसेल की, ते नक्की कोणत्या लोकांसोबत जोडले जात आहेत. पाकिस्तानी शहजाद भट्टी दुबईतून एक नेटवर्क चालवत आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना कट्टरतावाद आणि हेरगिरीच्या दलदलीत ढकलत आहे. तो अगदी सहजपणे तरुणांना यात ओढत आहे. तरुणांनाही याची कल्पना नाही की, ते नक्की काय करत आहेत. आता शहजाद भट्टीची उलटगणती सुरू झाली. महाराष्ट्र एटीएसच्या निशाण्यावर तो आहे. आज राज्यातील विविध शहरांमध्ये महाराष्ट्र एटीएस छापे टाकत मोठी कारवाई केली. ज्याने एकच खळबळ उडाली. आज सकाळी 8 वाजल्यापासून राज्यभरात एटीएसकडून छापेमारी सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई, पुणे नालासोपारा, मीरारोड, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव येथे ATS ची धाड सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या गँगस्टर्सशी जोडलेले किंवा त्यांना समर्थन देणाऱ्या व्यक्तींची एटीएसकडून चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील गँगस्टर नेटवर्क मोडीत काढण्यासाठी ही मोठी धडक कारवाई केली जात आहे.

राज्यातील काही तरुण या गँगस्टरच्या टोळीच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. हा भट्टी मुळ पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी आहे. मात्र, सध्या तो दुबईत राहून गँग चालवत आहे. भारतातील तरुणांना कट्टरतावाद आणि हेरगिरीमध्ये तो ढकलत आहे. याबाबत अधिकची माहिती मिळताच धडक कारवाई केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे.

शहजाद भट्टी याच्यासोबत सोशल मीडियावर संपर्कात असणाऱ्यांची चाैकशी होईल. गेल्या काही महिन्यांत भारतातील दहशतवादी भरती किंवा हेरगिरी संबंधित काही प्रकरणात थेट शहजाद भट्टी याचे नाव वारंवार पुढे येत आहे. ज्यानंतर ही थेटपणे कारवाई केली जात आहे. शहजाद भट्टी याची भारतावर वाकडी नजर आहे. तो भारतात आपले नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...