AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा भारतीय आयटी कंपन्यांना मोठा धक्का; अमेरिकेतील भारतीयांनाही दणका

या निर्णयामुळे आता या कंपन्यांना त्यांच्या H-1B कर्मचाऱ्यांसाठी नवीन ग्रीन कार्ड अर्ज दाखल करता येणार नाहीत किंवा प्रलंबित अर्जांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

अमेरिकेचा भारतीय आयटी कंपन्यांना मोठा धक्का; अमेरिकेतील भारतीयांनाही दणका
The US has excluded Indian IT companies from the Green Card program.
| Updated on: Oct 09, 2026 | 1:39 AM
Share

अमेरिकेच्या कामगार विभागाने भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. इन्फोसिस, टीसीएस (टाटा), विप्रो, एचसीएल, कॉग्निझंट आणि कॅपजेमिनीसह मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोब या ८ प्रमुख आयटी कंपन्यांना ‘परमनंट लेबर सर्टिफिकेशन’ या ग्रीन कार्ड प्रोग्रॅममधून तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि कामगार सचिव कीथ सोंडरलिंग यांनी ही घोषणा करताना, या कंपन्यांनी एच-१ बी व्हिसा नियमांचा गैरवापर करून अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्याचा आणि वेतन दडपल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेने भारतीय आयटी कंपन्यांविरुद्ध एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने त्यांना ग्रीन कार्डशी संबंधित असलेल्या ‘पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन (PERM)’ कार्यक्रमातून निलंबित केले आहे. यामध्ये कॉग्निझंट, इन्फोसिस, टाटा, विप्रो, एचसीएल आणि कॅपजेमिनी या भारतीय आयटी कंपन्यांचा समावेश आहे. तर मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोब या अमेरिकन कंपन्यानाही या कार्यक्रमातून निलंबित केले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या कंपन्यांवर ग्रीन कार्ड कार्यक्रमाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेचे कामगार सचिव कीथ सॉंडरलिंग यांनी ही कारवाईची घोषीत केली आहे, ते म्हणाले की, या मोठ्या कंपन्यांवर PERM प्रणालीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सॉंडरलिंग यांनी म्हटले की, अमेरिकेत मायक्रोसॉफ्टपेक्षा जास्त या प्रणालीचा गैरवापर इतर कोणत्याही कंपनीने केलेला नाही.

मेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी मायक्रोसॉफ्टवर मोठे गंभीर आरोप केले आहेत.  मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये अंदाजे ६,००० अमेरिकन कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. त्यावेळी, कंपनीने प्रमाणित केले होते की त्यांना या पदांसाठी पात्र अमेरिकन कामगार मिळाले नाहीत. असे असूनही, मायक्रोसॉफ्टला ६,००० पेक्षा जास्त एच-१ बी व्हिसा मंजूर करण्यात आले आणि कंपनीने ३,६८२ ग्रीन कार्ड अर्ज दाखल केले. व्हान्स यांनी दावा केला की, यापैकी अंदाजे १,००० अर्ज त्याच पदांसाठी होते, ज्या पदांवरून अमेरिकन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

एच-१बी व्हिसा प्रणालीचा उद्देश अमेरिकन कामगारांकडून भरता न येणारी पदे भरण्यासाठी उच्च पात्र परदेशी कामगारांना आणणे हा होता. मात्र ही प्रणाली आता मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि अनियमिततेने प्रभावित झाली आहे असेही जे.डी.व्हान्स यावेळी म्हणाले.

९ विद्यापीठांची चौकशी

हार्वर्ड, येल आणि स्टॅनफोर्डसारख्या प्रमुख विद्यापीठांसह नऊ विद्यापीठांनाही अमेरिकेच्या कामगार विभागाने चौकशीच्या फेऱ्यात ठेवले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, या विद्यापीठांनी अमेरिकन कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना नोकरीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. कामगार विभागाचे महानिरीक्षक अँथनी डी’एस्पोसिटो यांनी सांगितले की, या प्रकरणांमध्ये संबंधित संस्थांना समन्स बजावले आहेत.

Follow Us
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत