AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वीवर येणार पुराचे मोठे संकट ? संकटाची वर्दी देणारा ‘डुम्सडे’ मासा समुद्रातून अचानक किनाऱ्यावर आला

स्पॅनिश शहराच्या लास पाल्मास येथील समुद्रकिनाऱ्यावर एक दुर्मिळ ओअरफिश दिसला आहे. या माशाला संकटाची वर्दी देणारा मासा म्हटले जात आहे.सुमद्राकिनाऱ्यावर हा मासा आला काही वेळातच तो मेला. त्यामुळे घबराट पसरली आहे.

पृथ्वीवर येणार पुराचे मोठे संकट ? संकटाची वर्दी देणारा 'डुम्सडे' मासा समुद्रातून अचानक किनाऱ्यावर आला
| Updated on: Feb 20, 2025 | 4:25 PM
Share

अटलांटिक महासागराच्या कॅनरी बेटावरील स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर एक दुर्लभ मासा डुम्सडे आढळला आहे. या माशाला प्रलयाचा मासा म्हटले जाते. या माशाचे दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची नांदी म्हटले जाते. हा मासा अचानक समुद्रातून तडफडत किनाऱ्यावर आला आणि तो मृत पावला. ओअरफिश सहसा पाण्याच्या बाहेर दिसत नाही. अशी मान्यता आहे की हा मासा जेव्हा समुद्राच्या बाहेर पडतो तेव्हा काही तरी वाईट घडणार असल्याचे म्हटले जाते. या मासा दिसल्यानंतर भूकंप येत असल्याचा दावा देखील केला जात असतो, त्यामुळे घबराट पसरली आहे.

या संदर्भात AccuWeather यांनी एक्सवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओत एक ऑरफिश समुद्रातून किनाऱ्याकडे झेपावताना दिसला आहे. परंतू या विचित्र माशाचा आकार ओअर फिश प्रजातीच्या इतर माशांहून भिन्न आहे. हा मासा लहान आहे. हा मासा समुद्रातून बाहेर पडताच लागलीच मृत पावतो. समुद्र किनाऱ्यावरील लोकांनी या माशाला पाहीले आणि त्याला पुन्हा पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतू वाचू शकला नाही. या माशाचा आकार थोडा वेगळा आहे.त्याच्या डोक्यावर एक लाल रंगाचे हाड आहे.

येथे ट्वीट पाहा –

जगाचा शेवट आणि माशाचे सापडणे

जपानी लोककथामध्ये या माशांविषयी अनेक समजूती आणि मिथक तयार झाली आहे. या माशाला संकटाचा दाता मानले जाते. साल २०११ मध्ये फुकूशिमा भूकंप होण्याआधी समुद्र किनाऱ्यावर ओअरफिश दिसले होते. गेल्यावर्षी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये समुद्रातून एक ऑरफिश बाहेर आला होता. त्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये भूकंप झाला होता.

संशोधकांचे काय म्हणणे ?

संशोधकांच्या मते हा मासा आजारी असल्याने किनाऱ्यावर आला होता. त्याचा शुभ आणि अशुभ शकूनाशी काहीच संबंध नाही. ओअरफिश हा एक दुर्मिळ मासा असून तो अनेक वर्षांनी एकदाच कधीतरी दिसतो. या प्रजातीचे मासे खोल समुद्रात राहतात त्यामुळे ते फारसे कोणाच्या नजरेस पडत नाही. जेव्हा तो मार्ग चुकतो तेव्हाच तो जमीनीवर येतो. ओअर फिश याचे दिसणे आणि भूकंपाचा संबंध असल्याचे म्हटले जाते. नैसर्गिक संकट आणि भूकंपाचा अंदाज वर्तविणारा असे या माशाला नाव पडले आहे. परंतू २०१९ मध्ये झालेल्या संशोधनात भूकंप आणि या ओअरफिशचा तसा काही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.