
अटलांटिक महासागराच्या कॅनरी बेटावरील स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर एक दुर्लभ मासा डुम्सडे आढळला आहे. या माशाला प्रलयाचा मासा म्हटले जाते. या माशाचे दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची नांदी म्हटले जाते. हा मासा अचानक समुद्रातून तडफडत किनाऱ्यावर आला आणि तो मृत पावला. ओअरफिश सहसा पाण्याच्या बाहेर दिसत नाही. अशी मान्यता आहे की हा मासा जेव्हा समुद्राच्या बाहेर पडतो तेव्हा काही तरी वाईट घडणार असल्याचे म्हटले जाते. या मासा दिसल्यानंतर भूकंप येत असल्याचा दावा देखील केला जात असतो, त्यामुळे घबराट पसरली आहे.
या संदर्भात AccuWeather यांनी एक्सवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओत एक ऑरफिश समुद्रातून किनाऱ्याकडे झेपावताना दिसला आहे. परंतू या विचित्र माशाचा आकार ओअर फिश प्रजातीच्या इतर माशांहून भिन्न आहे. हा मासा लहान आहे. हा मासा समुद्रातून बाहेर पडताच लागलीच मृत पावतो. समुद्र किनाऱ्यावरील लोकांनी या माशाला पाहीले आणि त्याला पुन्हा पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतू वाचू शकला नाही. या माशाचा आकार थोडा वेगळा आहे.त्याच्या डोक्यावर एक लाल रंगाचे हाड आहे.
येथे ट्वीट पाहा –
A rare, “doomsday” oarfish was spotted at Baja California Sur beach in Mexico earlier this month, a fish that some believe is a signal of an impending disaster.
Oarfish are usually found in the depths of the ocean, thousands of feet below the surface. https://t.co/S12UJyL8lB pic.twitter.com/wJ8kppww38
— AccuWeather (@accuweather) February 19, 2025
जपानी लोककथामध्ये या माशांविषयी अनेक समजूती आणि मिथक तयार झाली आहे. या माशाला संकटाचा दाता मानले जाते. साल २०११ मध्ये फुकूशिमा भूकंप होण्याआधी समुद्र किनाऱ्यावर ओअरफिश दिसले होते. गेल्यावर्षी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये समुद्रातून एक ऑरफिश बाहेर आला होता. त्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये भूकंप झाला होता.
संशोधकांच्या मते हा मासा आजारी असल्याने किनाऱ्यावर आला होता. त्याचा शुभ आणि अशुभ शकूनाशी काहीच संबंध नाही. ओअरफिश हा एक दुर्मिळ मासा असून तो अनेक वर्षांनी एकदाच कधीतरी दिसतो. या प्रजातीचे मासे खोल समुद्रात राहतात त्यामुळे ते फारसे कोणाच्या नजरेस पडत नाही. जेव्हा तो मार्ग चुकतो तेव्हाच तो जमीनीवर येतो. ओअर फिश याचे दिसणे आणि भूकंपाचा संबंध असल्याचे म्हटले जाते. नैसर्गिक संकट आणि भूकंपाचा अंदाज वर्तविणारा असे या माशाला नाव पडले आहे. परंतू २०१९ मध्ये झालेल्या संशोधनात भूकंप आणि या ओअरफिशचा तसा काही संबंध नसल्याचे म्हटले जात आहे.