भर रस्त्यामध्ये मोठी खळबळ, जीव वाचवण्यासाठी लोक बसले लपून, थेट ग्रेनेड हल्ला, दोन जणांचा मृत्यू तर..

नुकताच एका धक्कादायक हल्लाचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते तर काही लोक जिथे जागा मिळेल तिथे लपून बसले.

भर रस्त्यामध्ये मोठी खळबळ, जीव वाचवण्यासाठी लोक बसले लपून, थेट ग्रेनेड हल्ला, दोन जणांचा मृत्यू तर..
grenade attack
| Updated on: Dec 20, 2025 | 8:29 AM

एक धक्कादायक घटना घडली आहे. तैवानमध्ये एका व्यक्तीने चाकू आणि स्मोक ग्रेनेडने लोकांवर हल्ला केला. तैपेई मेट्रो स्टेशनजवळ हा हल्ला केला. या हल्ल्यात दोन लोकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हैराण करणारे म्हणजे तैवान येथील या हल्ल्याचा व्हिडीओही पुढे आला आहे. पोलिसांनी हल्ला केलेल्या व्यक्तीचा पाठलाग केला, यादरम्यान तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये, हल्लेखोर एका पिशवीतून एक एक करून अनेक ग्रेनेड बाहेर काढल्या आणि लोकांवर थेट रस्त्याच्या मध्यभागी येऊन हल्ला केला. या हल्ल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अचानक भर रस्त्यामध्ये हल्ला झाल्याने काहीवेळ गोंंधळाची स्थिती निर्माण झाली. लोक आपला जीव वाचून पळताना दिसली. 

हल्लेखोराने थेट पिशवीतून ग्रेनेड काढून बराच वेळापर्यंत हल्ला सुरू ठेवला. त्याने पिशवीतून ग्रेनेड काढून फेकणे सुरूच ठेवले. यामुळे लोकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही लोक आपला जीव वाचून पळाले तर काही लोक जिथे जागा मिळेल तिथे लपून बसले. पिशवीतून त्याने थेट चाकू काढला आणि लोकांच्या मागे पळत त्याने हल्ला चढवला. हल्लोखोराने अनेक लोकांना टार्गेट केले.

या हल्ल्यात दोन जण ठार झाले, तर पाच जण जखमी झाले. हल्लेखोराने तोंडाला रूमाल बांधला होता. तो लोकांच्या अंगावर धावून धावून हल्ला करत होता. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी तैपेई पोलीस आणि अग्निशमन दलाला अशी माहिती मिळाली, तैपेई स्टेशनच्या M7 एक्झिटजवळ कोणीतरी स्मोक बॉम्ब फेकला आहे.

त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, धुरामुळे लोकांना त्रास होण्यास सुरूवात झाली. तैपेई स्टेशनवर, रेल्वे स्थानके, महामार्ग आणि विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली. हल्लेखोराची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असून पुढील तपास केला जात आहे. मात्र, या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे.