अमेरिकेतील भारतीयांमध्ये प्रचंड घबराट, थेट धडाधड जाणार नोकऱ्या?, ट्रम्प यांच्या धक्कादायक धोरणामुळे..
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी व्हिसाच्या नियमात मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे आता अमेरिकेत जाऊन नोकऱ्या करणे कठीण झालंय. त्यामध्येच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना एक मेल आला असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना आजपासून नवीन नियमाचे पालन करावे लागणार आहे. भारतीय नागरिकांच्या याच पार्श्वभूमीवर थेट व्हिसासंदर्भातील मुलाखतीही काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या. यादरम्यानच अमेरिकेत मोठा भूंकप आला असून अमेरिकेतील H-1B व्हिसा आणि H-4 व्हिसाधारकांना एक मेल आला आहे. दूतावासाकडून हा ईमेल आल्याची माहिती पुढे येतंय. ज्यामध्ये स्पष्टपणे कळवण्यात आले की, खबरदारीचे उपाय म्हणून तुमचे तात्पुरते कामाचे व्हिसा रद्द करण्यात आली. हा मेल पाहून अमेरिकेत राहणाऱ्या H-1B व्हिसा आणि H-4 व्हिसाधारकांची झोप उडाली आहे. यासोबतच कंपन्यांमध्येही मोठी खळबळ उडाली. अमेरिकेतील मोठ्या मोठ्या कंपन्या भारतासह इतर देशातील आपल्या कामगारांना अमेरिकेत याच व्हिसावर आणतात. अमेरिकेत मोठ्या संख्येने लोक H-1B व्हिसावर जाऊन काम करतात.
जर अचानक अमेरिकेत राहणाऱ्या सर्व H-1B व्हिसाधारकांचे व्हिसा रद्द केली तर कंपन्याही अडचणीत येतील. इमिग्रेशन वकील एमिली न्यूमन यांच्या मते, तात्पुरता व्हिसा रद्द करणे ही एक तात्पुरती आणि खबरदारीची उपाययोजना आहे. ही व्हिसाची कायमस्वरूपी रद्दबाबत अजिबात नाही. H-1B आणि H-4 व्हिसा धारकांसाठी तात्पुरते व्हिसा रद्द करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामध्येच या मेलने मोठी खळबळ उडाली आहे.
या रद्दतेबाबत निर्णयाचा अमेरिकेतील एखाद्या व्यक्तीच्या कायदेशीर स्थितीवर परिणाम होणार नाही. याचा अर्थ असा आहे की, अर्जदाराच्या पुढील व्हिसा भेटीच्या वेळी या प्रकरणाचा पुन्हा आढावा घेतला जाईल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्हिसाच्या नियमात सतत बदल होत आहे. अमेरिकेत H-1B व्हिसावर राहणे आता कठीण झाले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी व्हिसाच्या नियमात मोठे बदल केल्याने अनेक समस्यांना भारतीयांना सामोरे जावे लागतंय.
न्यूमनने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची सोशल मीडिया पोस्ट देखील शेअर केली, ज्यात म्हटले होते की, व्हिसा तपासणी ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेत येणाऱ्या H-1B व्हिसा धारकांची संख्या कमी करायची आहे. त्यामध्येच भारतासोबत मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे संबंध तणावात आहेत.
