Maldives parliamentary election : भारताला प्रचंड मोठा धक्का, मालदीवच्या निवडणुकीत नको ते घडलं

Maldives parliamentary election : मालदीवमध्ये काल संसदीय निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. हे निकाल निश्चित भारताच्या दृष्टीने चांगले नाहीत. मागच्या काही दिवसात भारत आणि मालदीवमधले संबंध प्रचंड बिघडले आहेत. ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती.

Maldives parliamentary election : भारताला प्रचंड मोठा धक्का, मालदीवच्या निवडणुकीत नको ते घडलं
Mohamed muizz
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 7:58 AM

मागच्या काही दिवसांपासून मालदीवमधील प्रत्येक घडामोड चर्चेचा विषय ठरली आहे. मालदीवमधल्या काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला. त्यानंतर भारतात मालदीवबद्दल संतापाची लाट उसळली. बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड आला होता. अनेक भारतीयांनी आपली मालदीवची बुकिंग रद्द केली होती. मालदीवचे विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या धोरणांमुळे हे संबंध आणखी बिघडले. आता रविवारी मालदीवच्या संसदीय निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली पीपुल्स नॅशनल काँग्रेसने 60 पेक्षा अधिक जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलय. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती.

मीडिया रिपोर्ट्नुसार 20 व्या पीपुल्स मजलिस (संसद) निवडणुकीसाठी स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान झालं. मतदान संपताच निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्या सील करुन मतमोजणी सुरु केली.

किती लाख लोकांनी केलं मतदान

मालदीवच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 लाख 7 हजार 693 लोकांनी मतदान केलं. एकूण 72.96 टक्के मतदान झालं. यात 1 लाख 4 हजार 826 पुरुष आणि 1 लाख 2 हजार 867 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 2 लाख 84 हजार 663 लोक मतदानासाठी पात्र होते.

मालदीवसाठी भारतात कुठे झालं मतदान?

मीडिया रिपोर्ट्नुसार संसदीय निवडणुकीसाठी मालदीव आणि तीन अन्य देशात एकूण 602 मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. 34 रिसॉर्ट्स, तुरुंग आणि अन्य औद्योगिक बेटांवर मतदान केंद्र बनवण्यात आली होती. रिपोर्ट्नुसार, मालदीवच्या बाहेर भारतात तिरुवनंतपुरम, श्रीलंकेत कोलंबो आणि मलेशियात कुआलालंपुरमध्ये मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या.

किती उमेदवार होते निवडणूक रिंगणात?

मालदीवमधल्या संसदीय निवडणुकीसाठी 6 पक्षांचे 368 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सहा पक्षांमध्ये मुइज्जू यांची पीपुल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी), मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टी (एमडीपी) आणि130 अपक्ष होते.

दोन-तृतीयांश बहुमत मिळवलं

सुरुवातीला जे निकाल हाती आले, त्यानुसार मुइज्जू यांच्या नेतृत्वाखालील पीएनसीने 93 सदस्यांच्या पीपुल्स मजलिसमध्ये 60 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवलाय. हे दोन-तृतीयांश बहुमत झालं. मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली पीएनसीला 67 जागा मिळाल्या. त्यानंतर एमडीपीला 12 सीट मिळाल्या आणि अपक्ष उमेदवार 10 जागांवर विजयी ठरले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.