डोनाल्ड ट्रम्प…, नोबेल प्राईज मिळाल्यानंतर मारिया कोरिना यांचं धक्कादायक वक्तव्य
व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार भेटला आहे. पुरस्काराची घोषणा होताच त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार भेटला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होताच, नोबेल पुरस्कारासाठी इच्छूक असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रापती डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं आहे. आपल्याला शांततेचा नोबल भेटावा अशी ट्रम्प यांची इच्छा होती, त्यांनी अनेकदा नोबेलवर आपला दावा देखील केला होता, एवढंच नाही तर आपण अनेक युद्ध थांबवल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र शांततेच्या नोबेल पुरस्काराने ट्रम्प यांना हुलकावणी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे मारिया कोरिना मचाडो यांच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा होताच, त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हेनेझुएलाच्या मुद्द्यावर समर्थन करण्यासाठी मी हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित करते असं त्यांनी म्हटलं आहे.
मारिया कोरिना मचाडो यांनी नेमकं काय म्हटलं?
मारिया कोरिना मचाडो यांनी नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सर्व व्हेनेझुएलाच्या नागरिकांना त्यांच्या संघर्षासाठी मिळालेली ही ओळख आहे. आम्हाला काम पूर्ण करण्यासाठी मिळालेली ही प्रेरणा आहे. आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. पहिल्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळाल्याबद्दल आम्ही राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका आणि जगातील लोकशाही देशांचे आभारी आहोत.
मारिया कोरिना यांचं मोठं वक्तव्य
पुढे बोलताना त्यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. मी हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या पीडित नागरिकांना तसेच आम्हाला आमचा उद्देश साधण्यासाठी निर्णायक समर्थन देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित करते. हुकूमशाहीतून लोकशाहीमध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी, शांतंतापूर्ण मार्गाने लढा दिल्याबद्दल 2025 चा शांततेसाठी दिला जाणार नोबेल पुरस्कार मारिया यांना जाहीर करण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा
दरम्यान शांततेसाठी दिला जाणारा नोबेल आपल्याला मिळावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा होती, मात्र या पुरस्काराने त्यांना हुलकावणी दिली आहे, अनेक प्रयत्न करून देखील शेवटी हा पुरस्कार मारिया यांना जाहीर झाला.
