डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ल्याचा आदेश, मध्यरात्री मोठा हल्ला, रशियाने म्हटले, कोणत्याही परिस्थितीमध्ये सैन्य…

डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावरून भारतावर दबाव टाकत आहेत. प्रकरण चिघळताना दिसत आहे. सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला विविध प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. पाकिस्तानने अमेरिकेच्या भूमीतून थेट भारताला धमकावले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ल्याचा आदेश, मध्यरात्री मोठा हल्ला, रशियाने म्हटले, कोणत्याही परिस्थितीमध्ये सैन्य...
Donald Trump
| Updated on: Aug 24, 2025 | 7:14 PM

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावून दणका दिलाय. डोनाल्ड ट्रम्प दुसरीकडे रशिया आणि युक्रेनच्या युद्धात मध्यस्थी करत आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:च्या फायद्याशिवाय काहीही करत नसल्याचे यापूर्वीची स्पष्ट झालंय. आता रशियाने गंभीर आरोप केलाय. रशियाने म्हटले की, पश्चिमी देश हे युक्रेन आणि रशियाच्या युद्धात मध्यस्थी होऊ देत नाहीत. रशियाचे विदेश मंत्री सरजेई लावरोव यांनी म्हटले की, पश्चिमी देशांची इच्छा नाहीये की, रशिया आणि युक्रेनचे युद्ध संपले पाहिजे. ते मुद्द्याम अशा काही गोष्टी करत आहेत, ज्यातून युद्धाबाबतची शांतता वार्ता होऊ नये. त्यांचे मुख्य ठरलेले आहे की, काहीही झाले तरीही दोन्ही देशांमध्ये चर्चा अजिबात होऊ नये.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये एक प्लॅटफॉर्म चर्चेसाठी तयार करून दिला. पण युक्रेनला तो हवा नाहीये. जेलेंस्की यांनी पुतिन यांच्यासोबतच्या भेटीसाठी मोठी अट ठेवलीये. जेलेंस्की यांचे म्हणणे आहे की, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी पश्चिमी देश आणि अमेरिकेने त्यांना सुरक्षा हमी द्यावी. जेलेंस्की यांच्या या अटीमुळे बैठक होऊ शकत नाहीये. रशियाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, काहीही झाले तरीही युक्रेनमध्ये युरोपचे सैन्य त्यांच्याकडून मान्य केले जाणार नाही.

एकप्रकारे रशियाने थेट मोठी धमकी दिली आहे. रशियाकडून दावा करण्यात आला आहे की, युक्रेनकडून रात्री काही भागात त्यांच्या हल्ले करण्यात आली. रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या ऊर्जा यंत्रणांना टार्गेट करून युक्रेनकडून हल्ले करण्यात आली. या हल्ल्यामध्ये रशियाच्या एका परमाणू ऊर्जा यंत्रणेला आग लागली, ही आग लागताच विझवण्यात देखील आली. डोनाल्ड ट्रम्प यांनीच युक्रेनला रशियावर हल्ले करण्यास सांगितले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर युक्रेनने हल्ले केली. रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील असलेल्या अमेरिकी कंपनीला टार्गेट करण्यात आले. रशियाच्या हल्ल्यात अमेरिकन कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि त्यांनी रशियावर हल्ला करण्याचे आदेश युक्रेनला दिली. रशिया आणि युक्रेनच्या सुद्धाबाबत शांतता वार्ता नेमकी कधी होते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.