AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुलाचा रंग काळा असेल या भितीने ब्रिटनच्या राजघराण्याने ‘प्रिन्स’ उपाधी दिली नाही”, मेगन मर्केल यांचा मोठा गौप्यस्फोट

ब्रिटनच्या राजघराण्यातील (British Royal Family) प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल (Meghan Markle) यांनी एका मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत.

मुलाचा रंग काळा असेल या भितीने ब्रिटनच्या राजघराण्याने 'प्रिन्स' उपाधी दिली नाही, मेगन मर्केल यांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Mar 08, 2021 | 5:40 PM
Share

Meghan Markle on Royal Family लंडन : ब्रिटनच्या राजघराण्यातील (British Royal Family) प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल (Meghan Markle) यांनी प्रसिद्ध अमेरिकन मुलाखतकार (टीव्ही होस्ट) ओप्रा विनफ्री (Oprah Winfrey) यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. यापैकी एक मोठा गौप्यस्फोट म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्याकडूनच वर्णभेदी वर्तन झालंय. “आमच्या मुलाला केवळ त्याचा रंग काळा असेल या एका संशयावरुन प्रिन्स ही उपाधी देण्यास नकार दिला (Meghan Markle on British Royal Family). मी गर्भवती असताना राजघराण्याने प्रिन्स उपाधी देण्याच्या नियमांमध्येच बदल केले. त्यामुळे माझा मुलगा आर्चीला प्रिन्स उपाधी देण्यात आली नाही,” अशी माहिती मेगन मर्केल यांनी दिली (Meghan Markle say that Royal Family refused to make Archie a Prince due to colour).

मेगन म्हणाल्या, “माझ्या मुलाचा रंग काळा असू शकतो अशी चिंता राजघराण्याला होती. आर्चीचा जन्म होण्याआधीच त्याच्या रंगावरुन काळजी व्यक्त करण्यात आली (Royal Family Refused To Make Archie a Prince). राजघराण्याला माझा मुलगा/मुलगी प्रिन्स किंवा प्रिन्सेज बनावी, असं वाटत नव्हतं. त्याचा जन्म होण्याआधीच हे ठरवण्यात आलं. जन्मानंतर त्याचं लिंग वेगळं असू शकलं असतं आणि तो प्रोटोकॉलपेक्षा वेगळ ठरला असता म्हणूनच त्याला सुरक्षा मिळाली नाही.”

जन्माआधीच राजघराण्यात मुलाच्या रंगावरुन चर्चा

मेगन यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाच्या जन्माआधीपासूनच त्याच्या रंगावर चर्चा सुरु करण्यात आली. “मी जेव्हा गर्भवती होते, तेव्हा सर्व ठिकाणी त्या मुलाला प्रिन्स उपाधी, सुरक्षा मिळणार की नाही याविषयीच चर्चा होती. याशिवाय ते मुल जन्माला आल्यानंतर त्याचा रंग कसा असेल यावरही काळजी व्यक्त केली जात होती.” मुलाखतकार ओप्रा यांनी मेगन आणि हॅरी यांना विचारलं होतं की त्यांचा मुलगा आर्ची याला जन्मानंतर प्रिन्सची उपाधी का देण्यात आली नाही. याचं उत्तर देताना मेगन यांनी वरील सर्व माहिती दिली.

… आणि मेगनला जगण्याची इच्छाच राहिल नाही

आपल्या मुलाखतीत मेगन यांनी सांगितलं की आजूबाजूच्या लोकांच्या चर्चांनी त्यांना प्रचंड नैराश्य आलं होतं. “मुलाच्या रंगावरुन चर्चा सुरु झाल्याने माझ्या मनात आत्महत्येचाही विचार येऊन गेला. या सर्व अडचणींमुळे मला जगायचीच इच्छा राहिली नाही. ही गोष्ट पती हॅरीला सांगताना मला लाज वाटत होती. कारण हॅरीनेही आपल्या जीवनात बरंच काही गमावलं होतं. असे विचार माझ्या मनात सारखे येत होते,” असंही मेगनने नमूद केलं.

हेही वाचा :

ब्रिटनचा राजपुत्रही ‘सैराट’, बाळाचं नाव ‘आर्ची’ ठेवलं!

व्हिडीओ पाहा :

Meghan Markle say that Royal Family refused to make Archie a Prince due to colour

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.