AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात केवळ याच देशात स्री-पुरुष समान अधिकार, पाहा कोणते देश ?

या यादीत वेस्ट बॅंक आणि गाझापट्टी सर्वात खालच्या पातळीवर आहेत. येथे महिलांना व्यावसायिक आणि कायदेशीर अधिकार नसल्याच्या बराबर आहे. यानंतर यमन, सुदान आणि कतार या देशांचा क्रमांक लागतो.

जगात केवळ याच देशात स्री-पुरुष समान अधिकार, पाहा कोणते देश ?
| Updated on: Nov 12, 2024 | 9:00 PM
Share

जगात स्री आणि पुरुष हे समान पातळीवर आहेत. आज महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. परंतू तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन किंवा अधिकार दिले जात आहेत. आपण आधुनिक नावालाच बनत चाललो असून अजूनही पुरुषांना स्रियांनी पुढे गेलेले रुचत नाही. जेव्हा महिलांना पुरुषांच्या बरोबरीची संधी देण्याची वेळ येते तेव्हा अनेक पुरुष मंडळी घाबरत असतात. या संदर्भात कागदावर असलेली स्री-पुरुष समानता प्रत्यक्षात कशी आहे हे आपण जागतिक बॅंकेच्या अहवालावरुन पाहूयात….

साल 2023 मध्ये वर्ल्ड बॅंकेच्या प्रकाशित झालेल्या अहवालानुसार महिलांना व्यवसाय आणि कायद्याच्या आधारे जगातील केवळ 14 देशांमध्ये समान अधिकार आहेत. या देशात बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, ग्रीस, आईसलॅंड, आयर्लंड, लातविया, लक्झमबर्ग, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, जर्मनी आणि नेदरलॅंड यांचा समावेश आङे. या 14 देशात पुरुष आणि महिलांना कायद्याचे अवडंबर न माजवता व्यावासायिक दृष्टीकोनातून संपूर्णपणे समान अधिकार दिले जातात.

जर्मनी आणि नेदरलॅंड अभिनंदनास पात्र

साल 2023 मध्ये 100 गुण मिळविणाऱ्या यादीत जर्मनी आणि नेदरलॅंड पहिल्यांदा सामील झाले होते. या दोन देशांनी अनेक प्रकरणात महिला आणि पुरुषांच्या अधिकारांना एक सारखे केले. जसे आई-वडीलांच्या सुटीचा अधिकार समान बनविला. याशिवाय असे अनेक अधिकार आहेत ज्यात महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे.

या देशात महिलांची अवस्था कठीण

या यादीत वेस्ट बॅंक आणि गाझापट्टीचे स्थान सर्वात खालच्या पातळीवर आहे. येथे महिलांना व्यावसायिक आणि कायदेशीर अधिकार नसल्यात जमा आहे.यानंतर यमन, सुदान आणि कतार यांचा क्रमांक लागतो.या देशात महिलांना व्यावसायिक आणि कायदेशीर अधिकार खूपच कमी आहेत.साल 2019 च्या यादीत सर्वात खाली सौदी अरब देश होता. परंतू अलिकडे त्यांच्याकडे लागू केलेल्या नवीन कायद्याने सौदी अरबचा स्कोअर सुधारला आहे आणि तो आता 71.3 टक्क्यांसह 136 व्या स्थानावर आहे.

Follow Us