AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावर थरकाप आणणारी घटना, होर्मुज खाडीत भारताच्या दिशेने निघालेल्या जहाजावर गोळीबार, थेट व्हाईस कॅप्टन..

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणभोवती मोठी नाकेबंदी केली. या नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाही. होर्मुज खाडीत इराण आक्रमक झाल्याचेही बघायला मिळत आहे.

अंगावर थरकाप आणणारी घटना, होर्मुज खाडीत भारताच्या दिशेने निघालेल्या जहाजावर गोळीबार, थेट व्हाईस कॅप्टन..
Strait of Hormuz
| Updated on: Apr 24, 2026 | 9:50 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनले आहे. होर्मुज खाडीत परिस्थिती चिघळताना दिसत आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने होर्मुज खाडीतून भारताच्या दिशेने निघालेल्या जहाजावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर त्यांनी ‘एपामिनोड्स नावाचे जहाज जप्तही केले. हे जहाज भारताच्या दिशेने निघाले होते. हे जहाज जप्त करताना इराणकडून आरोप करण्यात आला की, हे जहाज परवानगी नसतानाही होर्मुज खाडी पार करत होते. त्यामुळे संपूर्ण सागरी सुरक्षा धोक्यात येऊ शकली असती. आम्ही जहाजाला थांबण्यास सांगितले. मात्र, जहाज काही थांबत नव्हते मग आम्ही जहाजावर गोळीबार केला आणि जहाज ताब्यात घेतले. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील सद्भावना नगरचे रहिवासी असलेले मर्चंट नेव्हीचे व्हाईस कॅप्टन संजय माहेर हे जहाजावर आहेत. इराणने जहाज जप्त करण्यापूर्वी नक्की काय घडले हे सांगताना ते दिसले.

व्हाईस कॅप्टन संजय माहेर यांनी म्हटले की, ज्यावेळी आम्ही होर्मुज खाडी पार करत होतो, त्यावेळीच आमच्या जहाजावर गोळीबार करण्यात आला. परिस्थिती बिघडताना दिसली. त्यानंतर आम्ही 21 कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. संजय माहेर यांच्या माहितीनुसार, 20 दिवसांपूर्वी साैदी अरेबियाला जाण्यासाठी ते घरून निघाले होते. गेल्या 15 वर्षांपासून ते नौदलात काम करत आहे.

लायबेरियन ध्वज असलेले कंटेनर जहाज गेल्या तीन ते चार दिवसांपासून गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे जाण्यासाठी वा पाहत होते. होर्मुज खाडीजवळ थांबले होते. होर्मुज खाडीच्या जवळ पोहोचत्याच त्यांच्यावर गोळीबार झाला. आयआरजीसीने जहाजाला अडवून त्याचा ताबा घेतला. त्यानंतर जहाजाला इराणी किनाऱ्याजवळ नेण्यात आले. इराणी नौदलाचा दावा आहे की, जहाजाची नेव्हिगेशन प्रणाली हॅक झाली होती.

फक्त हेच नाही तर अजून एक जहाज देखील इराणकडून जप्त करण्यात आले. इस्रायलच्या मालकीचे फ्रान्सेस्का जहाज इराणकडून ताब्यात घेण्यात आले. होर्मुज खाडीत तणाव कमी आहे. इराणच्या परवानगीशिवाय जहाजांना होर्मुज खाडी पार करता येत नाही. शिवाय दुसरीकडे मोठी नाकेबंदी अमेरिकेने इराणीच्या होर्मुज खाडीत केली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल